मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

शाओमीचा Smart Fan लवकरच भारतात होणार लाँच, मोबाईलवरुन ऑपरेट येणार करता; जाणून घ्या Features

शाओमीचा Smart Fan लवकरच भारतात होणार लाँच, मोबाईलवरुन ऑपरेट येणार करता; जाणून घ्या Features

चीनची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं बनवणारी कंपनी शाओमी (Xiomi) सातत्याने नवनवीन प्रॉडक्ट्स बाजारात आणत असते. जगभरात स्मार्टफोन व्यतिरिक्त अन्य विविध प्रकारची उत्पादने विकणाऱ्या शाओमीचे भारतात मात्र अगदी निवडक प्रॉडक्ट्स मिळतात.

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: आपल्या स्मार्टफोनव्यतिरिक्त आजूबाजूच्या बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूही स्मार्ट होत चालल्या आहेत. स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फ्रीज, स्मार्ट वॉशिंग मशीन यासोबतच आता स्मार्ट फॅन्सही बाजारात उपलब्ध आहेत. चीनची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं बनवणारी कंपनी शाओमी (Xiomi) सातत्याने नवनवीन प्रॉडक्ट्स बाजारात आणत असते. जगभरात स्मार्टफोन व्यतिरिक्त अन्य विविध प्रकारची उत्पादने विकणाऱ्या शाओमीचे भारतात मात्र अगदी निवडक प्रॉडक्ट्स मिळतात. शाओमी आता आपला स्मार्ट फॅन (Xiomi Smart Fan) भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर (Xiomi telegram) केलेल्या एका पोस्टमधून कंपनीने ही माहिती दिली आहे. चीनमध्ये हा स्मार्ट फॅन याआधीच लाँच करण्यात आला आहे.

या स्मार्ट फॅनला (Smart Fan in india) आपल्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटला कनेक्ट करता येऊ शकते. डीसी मोटरवर चालणाऱ्या या स्मार्ट फॅनमध्ये (Mi Smart Standing Fan 2) स्पीड कंट्रोलच्या 100 लेव्हल दिल्या गेल्या आहेत. कंपनीने आपल्या टेलिग्राम अकाऊंटवरुन या फॅनचा फोटो आणि माहिती शेअर करत, लोकांकडून याबाबतच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. या प्रतिक्रिया घेण्यासाठी कंपनीने सर्व्हे फॉर्मही शेअर केला होता. हा फॉर्म भरण्याची मुदत आता संपली आहे.

माध्यमांमधील माहितीनुसार, आतापर्यंत शाओमीने भारतात एकही स्मार्ट फॅन लाँच केला नाही. आता थेट ‘एमआय स्मार्ट स्टँडिंग फॅन 2’ (Mi Smart Standing Fan 2) भारतात लाँच करण्याच्या तयारीत शाओमी आहे. मात्र, कंपनी भारतात या स्मार्ट फॅनला दुसऱ्या नावाने लाँच (Mi Smart Fan India launch) करु शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी भारतात होणाऱ्या स्मार्टर लिव्हिंग इव्हेंटमध्ये (Smarter living event) हा स्मार्ट फॅन लाँच केला जाऊ शकतो.

डार्क मोडमुळे स्मार्टफोनची Battery Life वाढते? संशोधकांनी केला मोठा खुलासा

3.2 किलो वजनाच्या (Mi Smart Fan weight) या स्मार्ट फॅनला मजबूत प्लास्टिक बॉडी आहे. याच्या प्रोपेलरवर सात लहान ब्लेड्स, म्हणजेच पाती आहेत. एकदम युनिक (Mi Smart Fan features) असं डिझाईन असलेला हा पंखा कमीत कमी आवाज करतो आणि चांगली हवा देतो, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा फॅन सर्वात कमी स्पीडला 30.2db, आणि सर्वाधिक स्पीडला 55.8db एवढा आवाज (Mi Smart Fan noise) करतो. हा स्मार्ट फॅन मोबाईल आणि टॅब्लेटला जोडता येतो. स्मार्टफोनच्या माध्यमातूनच याला सुरू किंवा बंद करणे, वेग कमी-जास्त करणे अशी कामं केली जाऊ शकतात. तसेच हा फॅन गुगल आणि अलेक्सा या व्हॉईस असिस्टंट्सनाही सपोर्ट करतो. हा स्टॅंडिंग फॅन असल्यामुळे यात सुरक्षेसाठी चाईल्ड लॉकही देण्यात आले आहे.

First published:

Tags: Smartphone