मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Airtel युजर्सला फ्री मिळेल Netflix, या 5 स्टेप्स फॉलो करुन मिळवा फायदा

Airtel युजर्सला फ्री मिळेल Netflix, या 5 स्टेप्स फॉलो करुन मिळवा फायदा

एयरटेलने (Airtel) ब्रॉडब्रँड युजर्ससाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. एयरटेलने काही निवडक Broadband Plans सह Netflix प्लॅन देण्याची घोषणा केली आहे.

एयरटेलने (Airtel) ब्रॉडब्रँड युजर्ससाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. एयरटेलने काही निवडक Broadband Plans सह Netflix प्लॅन देण्याची घोषणा केली आहे.

एयरटेलने (Airtel) ब्रॉडब्रँड युजर्ससाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. एयरटेलने काही निवडक Broadband Plans सह Netflix प्लॅन देण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, 4 मे : Airtel ने नुकतेच नवे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत, जे कमी किमतीत अधिक बेनिफिट्स ऑफर करतात. एयरटेलचे अनेक प्लॅन्स आहेत, ज्यासह नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन मोफत दिलं जातं. आता एयरटेलने ब्रॉडब्रँड युजर्ससाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. एयरटेलने काही निवडक Broadband Plans सह Netflix प्लॅन देण्याची घोषणा केली आहे. एयरटेलच्या प्रोफेशनल प्लॅन आणि इन्फिनिटी प्लॅनसह नेटफ्लिक्स फ्रीमध्ये ऑफर केलं जाणार आहे.

Airtel Professional Plan -

एयरटेलच्या प्रोफेशनल प्लॅनची किंमत 1498 रुपये प्रति महिना आहे. तर इन्फिनिटी प्लॅन 3,999 रुपये प्रति महिना किमतीत आहे. प्रोफेशनल प्लॅन युजर्सला 199 रुपयांचा Netflix Basic Plan फ्री मिळेल.

हे वाचा - बॅगमध्येच झाला Realme Smartphone चा ब्लास्ट, फोटो पाहून कंपनीने दिलं असं उत्तर

Airtel Infinity Plan -

जे युजर्स एयरटेलचा Infinity Plan निवडतात, त्यांना Netflix च्या प्रीमियन प्लॅनचं मंथली सब्सक्रिप्शन मिळतं. भारतात नेटफ्लिक्सचे चार प्लॅन मिळतात. यात मोबाइल प्लॅन, बेसिक प्लॅन, स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन मिळतात. एयरटेल ब्रॉडब्रँड प्लॅन्सवर Netflix अॅक्टिव्ह करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

हे वाचा - WhatsApp ची मोठी कारवाई, 18 लाखांहून अधिक भारतीय अकाउंट्स बॅन; एक चूक पडली भारी

- सर्वात आधी Airtel Thanks App ओपन करा. त्यात Discover Thanks Benefit पेजवर जा.

- आता खाली स्क्रोल करा आणि Enjoy your rewards सेक्शनमध्ये Netflix दिसेल.

- त्यावर क्लिक करुन Claim निवडा.

- Netflix प्रोडक्ट पेजवर Proceed ऑप्शनवर क्लिक करा.

- अॅक्टिवेट झाल्यानंतर युजरला Netflix वर रिडायरेक्ट केलं जाईल.

दरम्यान, पेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. देशभरात हजारो युजर्स एलपीजी सिलेंडर ऑनलाइन बुक करण्यासाठी पेटीएमचा वापर करतात. Paytm App वर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्याआधी केवळ कूपन कोड 'FREEGAS' चा वापर करावा लागेल.

First published:
top videos

    Tags: Airtel, Netflix, Tech news