नवी दिल्ली, 3 मे : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp सतत आपल्या युजर्सला नवं अपडेट, नवे फीचर्स देत असतं. परंतु सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या App मध्ये अनेक फ्रॉड, काही चुकीच्या गोष्टी आढळ्यास कंपनीकडून याची दखल घेत अशा युजर्सवर कारवाईही केली जाते. आता नुकतंच WhatsApp ने भारतात तब्बल 18 लाखहून अधिक अकाउंट्स बॅन करत कारवाई केली आहे.
WhatsApp ने मार्च 2022 चा रिपोर्ट जारी केला आहे. यात दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp ने 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान तब्बल 18 लाखहून अधिक अकाउंट्स बॅन केले आहेत. हे फेब्रुवारी महिन्याहून जवळपास 8 लाख अधिक आहेत. WhatsApp ने फेब्रुवारी महिन्यात जवळपास 10 लाख अकाउंट्स बॅन केले होते. कंपनीने आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये सांगितलं, की IT नियम 2021 फॉलो करत हा रिपोर्ट जारी केला जातो. त्यानुसार आता मार्च महिन्याचा रिपोर्टही जारी केला गेला आहे.
युजर्सची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळेच युजर्सकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे कंपनीने या 18 लाख अकाउंट्सवर कारवाई केली आहे. हे अकाउंट्स हार्मफूल अॅक्टिव्हिटीमध्ये सामिल असल्याच्या कारणाने बॅन केले गेले आहेत. WhatsApp च्या पॉलिसी आणि गाइडलाइन्स फॉलो न केल्याने कंपनीने ही कारवाई करत थेट अकाउंट बंद केली आहेत.
WhatsApp वरुन फेक माहिती, दुसऱ्याच्या नावाने फेक अकाउंट ओपन करुन ते वापरणं, छळ, मालवेअर-सस्पेशियस लिंक, अनवेरिफाइड फॉर्वर्ड मेसेज पसरवणं अशा गोष्टी घडत असल्यास ते अकाउंट कंपनीकडून बंद केलं जातं. मागील एक वर्षापासून कंपनीने फेक माहितीचा प्रसार रोखण्यासाठी मेसेज फॉर्वर्डबाबतचे अनेक फीचर्स, अपडेटही जारी केले आहेत.
WhatsApp सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे कंपनी या App मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या कंटेंटबाबत अधिक सतर्क आहे. युजर्सच्या सुरक्षेसाठी सेफ्टी आणि इतर नवे फीचर्स सतत अपडेट केले जातात. WhatsApp चे काही नियम आहेत, ते फॉलो न केल्यास तुमचं WhatsApp Account कायमसाठी बॅन होऊ शकतं. अनेकदा WhatsApp वर चुकून केलेली एखादी चूक महागत पडू शकते आणि WhatsApp Account थेट बॅन होऊ शकतं. फेक न्यूज पसरण्यापासून रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप युजर्सला एखाद्या गोष्टीबाबत रिपोर्ट करण्याचीही सुविधा देतं. या सुविधेद्वारे युजर्सनी केलेल्या तक्रारींवरुन कंपनीने ही कारवाई केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp News, WhatsApp user