मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

'भारतीय कर्मचाऱ्यांबाबत चिंता', Twitter च्या ऑफिसवरील छापेमारीनंतर कंपनीची पहिली प्रतिक्रिया

'भारतीय कर्मचाऱ्यांबाबत चिंता', Twitter च्या ऑफिसवरील छापेमारीनंतर कंपनीची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली, गुरुग्राम येथील कार्यालयांमध्ये नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईनंतर भारतातील कर्माचाऱ्यांची मोठी चिंता असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.

दिल्ली, गुरुग्राम येथील कार्यालयांमध्ये नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईनंतर भारतातील कर्माचाऱ्यांची मोठी चिंता असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.

दिल्ली, गुरुग्राम येथील कार्यालयांमध्ये नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईनंतर भारतातील कर्माचाऱ्यांची मोठी चिंता असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 मे : काँग्रेसकडून कथितरित्या देशाची प्रतिमा मलिन करणं आणि कोरोनाच्या काळात मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कथित 'टूलकिट' प्रकरणी ट्विटर ऑफिसवरील छापेमारीनंतर ट्विटरने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली, गुरुग्राम येथील कार्यालयांमध्ये नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईनंतर भारतातील कर्माचाऱ्यांची मोठी चिंता असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.

आयटी नियमांच्या अशा तत्वांमध्ये बदलांची वकिली करण्याची योजना, ही मुक्त आणि खुल्या सार्वजनिक संवादात अडथळा आणते. भाजप नेत्याच्या ट्विटमध्ये 'manipulated media' असा टॅग आल्यानंतर त्याला टॅगला उत्तर देताना पोलिसांद्वारा करण्यात आलेल्या धमकावण्याच्या कृतीमुळे चिंतेत असल्याचंही ट्विटरने म्हटलं आहे.

ट्विटर प्रवक्यांनी सांगितलं, की भारतात लागू असलेल्या कायद्याचं पालन करण्याचा प्रयत्न करु आणि सरकारशी संवाद सुरू ठेऊ. सध्या भारतात आमच्या कर्मचाऱ्यांविषयी नुकत्याच घडलेल्या घटनांबद्दल आणि आमच्या युजर्सच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास होणाऱ्या संभाव्य धोक्याबद्दल आम्हाला चिंता आहे. तसंच भारत आणि जगभरातील नागरिक, समाजाच्या लोकांसह आम्ही पोलिसांकडून धमकावण्याच्या रणनीतिच्या वापराबद्दल चिंतीत असल्याचंही ट्विटरने सांगितलं.

तसंच, कायद्याच्या कक्षेत राहून पारदर्शकता, प्रत्येकाला सशक्त बनवणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनियतेची सुरक्षा करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचंही ट्विटरने म्हटलं आहे.

(वाचा - नवीन नियमांचं पालन करण्याचा स्टेटस रिपोर्ट त्वरित सादर करण्याचे केंद्राचे आदेश)

काय आहे वाद?

18 मे रोजी भाजपचे मुख्य प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजप महासचिव बीएल संतोष यांनी चार-चार पेजचं दोन वेगवेगळे स्क्रीनशॉट ट्वीट केले. यामध्ये एक स्क्रीनशॉट कोरोना आणि दुसरा सेन्ट्रल विस्टा प्रोजेक्टबाबत होता. हे टूलकिट काँग्रेसचं असल्याचा दावा या दोघांनी केला होता. तसंच कोरोनाच्या काळात मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी हे टूलकीट तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी ट्वीटमध्ये केला.

संबित पात्रा यांनी आरोप केला, की या टूलकीटमध्ये काँग्रेसने कार्यकर्त्यांना मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी 'सुपर स्प्रेडर कुंभ', व्हायरसच्या म्युटन्टला 'मोदी स्ट्रेन' यांच्यासारख्या शब्दांचा वापर करायला सांगितला.

संबित पात्रा यांच्या या ट्वीटला नंतर ट्विटरने मॅन्युपुलेटेड मीडिया सांगितलं. ट्विटरच्या या भूमिकेवर केंद्र सरकारनेही नाराजी व्यक्त केली. सूचना प्रसारण मंत्रालयाने या ट्वीटवरून मॅन्युपुलेटेड मीडिया हा टॅग हटवायला सांगितलं, कारण याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. ट्विटरने हे पाऊल उचलल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपविरोधात तुघलकरोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, यानंतर दिल्ली पोलीस स्पेशल सेलला ही केस ट्रान्सफर करण्यात आली.

(वाचा - Airtel CEO चा इशारा, चुकूनही हे App डाउनलोड करू नका, अन्यथा...)

दरम्यान, भाजप प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांच्या ट्वीटला मॅन्युपुलेटेड मीडिया सांगणाऱ्या ट्विटर इंडियाच्या (Twitter India) ऑफिसवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) धाड टाकली होती. संबित पात्रा यांचं ट्वीट मॅन्युपुलेटेड असल्याचं सांगितल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ट्विटरला नोटीस पाठवली आणि याबाबतचा पुरावा द्यायला सांगितलं, यावर ट्विटरने मात्र आपण ही माहिती द्यायला बांधील नसल्याची प्रतिक्रिया दिली. ट्विटरकडून हे उत्तर मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांच्या दोन कार्यालयांवर धाडी टाकल्या.

First published:

Tags: Tech news, Twitter, Twitter account