जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp अकाउंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका; लीक होऊ शकतं चॅट

WhatsApp अकाउंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका; लीक होऊ शकतं चॅट

WhatsApp अकाउंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका; लीक होऊ शकतं चॅट

WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे (WhatsApp Privacy Policy) युजर्स, दुसऱ्या मेसेजिंग अ‍ॅप्सकडे स्विच होत आहेत. त्यामुळे अनेक जण फोनमधून WhatsApp थेट अनइन्स्टॉल करत आहेत. परंतु हा योग्य पर्याय नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जानेवारी : WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेक युजर्समध्ये नाजारीचं, संभ्रमाचं वातावरण आहे. व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी सर्व युजर्सना ऍक्सेप्ट करावी लागणार आहे. अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट होईल. या नव्या पॉलिसीद्वारा लोकांची खासगी माहिती शेअर होत असल्याच्या आरोपांमुळे WhatsApp च्या युजर्समध्ये घट झाल्याचं चित्र असून अनेक युजर्स सिग्नल, टेलिग्राम या अ‍ॅप्सकडे वळले आहेत. युजर्स आपला डेटा प्रायव्हेट ठेऊ इच्छित असल्यास, त्यांना अ‍ॅप अनइन्स्टॉल नाही, तर डिलीट करावं लागेल. जर अकाउंट डिलीट केलं नाही, तर डेटा व्हॉट्सअ‍ॅपकडे राहील. एवढंच नाही, तर अकाउंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत युजर्सचा डेटा WhatsApp कडे राहतो. WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे (WhatsApp Privacy Policy) युजर्स, दुसऱ्या मेसेजिंग अ‍ॅप्सकडे स्विच होत आहेत. त्यामुळे अनेक जण फोनमधून WhatsApp थेट अनइन्स्टॉल करत आहेत. परंतु हा योग्य पर्याय नाही. दुसऱ्या ऍपवर स्विच होताना व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करणं आवश्यक आहे. त्यामुळे कोणतीही माहिती लीक होण्याची शक्यता कमी होते.

(वाचा -  देशातील पहिल्या Air Taxi चा शुभारंभ; या मार्गावर सेवा सुरू )

अँड्रॉईड युजर्सला व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट करण्यासाठी, मेन स्क्रिनवर बाजूला दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेटिंग्समध्ये अकाउंट ओपन करुन डिलीट माय अकाउंटवर क्लिक करावं. त्यानंतर मोबाईल फोन नंबर टाकावा लागेल आणि नंतर डिलीट माय अकाउंटवर क्लिक करावं लागेल. यावेळी अकाउंट डिलीट करण्याचं कारण विचारलं जाईल. यात कारण सांगून पुढील प्रोसेस होईल.

(वाचा -  Whatsapp चं नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत स्पष्टीकरण; शेअर होणार नाही Private Chat )

एकदा अकाउंट डिलीट झाल्यानंतरही, 90 दिवसांपर्यंत WhatsApp कडे युजर्सचा डेटा राहतो. पण ही माहिती WhatsApp च्या सर्व्हरवर राहील, जेणेकरुन इमरजेंसीमध्ये बॅकअप घेतला जाऊ शकतो.

(वाचा -  WhatsApp च्या नव्या पॉलिसीमुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका? वाचा हे FACTS )

आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी WhatsApp ला इतर पर्याय शोधले आहेत. मात्र WhatsApp ने याचं खंडन करतं या अफवा असल्याचं सांगितलं असून, प्रायव्हेट चॅट शेअर होणार नसल्याचा दावा केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात