नवी दिल्ली, 15 जानेवारी : मकर संक्रांतीच्या दिवशी भारतीयांना एअर टॅक्सीच्या (Air Taxi) रुपात एक नवी भेट मिळाली आहे. देशातील पहिली एअर टॅक्सी सर्व्हिस चंडीगढ ते हरियाणातील हिसारसाठी सुरू करण्यात आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी एअर टॅक्सी सर्व्हिसचा शुभारंभ केला. एअर टॅक्सी सुरू झाल्याने आता हिसार (Hisar) ते चंडीगढपर्यंतचा (Chandigarh) प्रवास केवळ 50 मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे. विशेष बाब म्हणजे, एअर टॅक्सीचं भाडं, रस्त्यावर चालणाऱ्या टॅक्सीप्रमाणेच असेल. चार सीटर एअर टॅक्सी विमानाचं हरियाणा ते चंडीगढपर्यंतचं भाडं प्रति व्यक्ती 1755 रुपये आहे. एअर टॅक्सीमुळे वेळ आणि पैसे दोघांची बचत होणार आहे. एअर टॅक्सीतून प्रवास करताना चेक इनसाठी तासभर आधी जाण्याची गरज नाही. केवळ 10 मिनिटं आधी जाऊन एअर टॅक्सी विमानात सीट मिळवता येणार आहे. सध्या केवळ हिसार ते चंडीगढसाठी एअर टॅक्सी सुरू करण्यात आली आहे. परंतु येणाऱ्या काळात देशातील वेगवेगळ्या 26 मार्गांवर एअर टॅक्सी सर्व्हिस सुरू केली जाणार आहे. एअर टॅक्सीचा दुसरा टप्पा 18 जानेवारी रोजी सुरू होईल. यावेळी हिसार ते डेहरादूनसाठी (Hisar to Dehradun) एअर टॅक्सी उड्डाण करेल. तिसऱ्या टप्प्यात चंडीगढ ते डेहरादून (Chandigarh to Dehradun) आणि हिसार ते धर्मशालादरम्यान (Hisar to Dharamshala) एअर टॅक्सी सुरू केली जाणार आहे. त्यानंतर हरियाणा ते शिमला, कुल्लूसह इतर अनेक मार्गांवर Air Taxi सर्व्हिस सुरू केली जाईल.
In 2nd phase, services for Hisar to Dehradun will be started on January 18. In the 3rd phase, two more routes from Chandigarh to Dehradun & Hisar to Dharamshala will be added on January 23. The company also plans to include Shimla, Kullu & more Haryana routes: Haryana CM Khattar https://t.co/fUtK0IrYK8
— ANI (@ANI) January 14, 2021
हवामानावर अवलंबून उड्डाण - Air Taxi प्रवास सुलभ आणि जलद करेल, परंतु हे उड्डाण हवामानावर अवलंबून असेल. जर हवामान योग्य असेल, तर एअर टॅक्सीतून प्रवास करता येईल. परंतु हवामान खराब असल्यास प्रवास करता येणार नाही. Air Taxi Service केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत (UDAN scheme) सुरू करण्यात आली आहे. आता हिसार एअरपोर्ट भारत सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत सामिल करण्यात आलं आहे.