नवी दिल्ली, 9 जानेवारी : WhatsApp च्या ज्या नव्या पॉलिसीमुळे नेटकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे, त्यावर Social Messaging अॅपने स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही युजरचं प्रायव्हेट चॅट पब्लिक होणार नाही. ज्याने युजर्सचा बिझनेस वाढेल, केवळ तिचं माहिती फेसबुकवर (Facebook) दिली जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
कंपनीने आपल्या रिलीजमध्ये सांगितलं की, नव्या अपडेटमुळे व्हॉट्सअॅपद्वारे शॉपिंग आणि बिझनेस करणं अधिक सोपं होईल. अधिकतर लोक सध्या व्हॉट्सअॅपचा वापर चॅटिंग व्यतिरिक्त बिझनेस अॅप म्हणूनही करत आहेत. आम्ही आपली प्रायव्हसी पॉलिसी बिझनेससाठी एक सुरक्षित होस्टिंग सर्व्हिस म्हणून अपडेट केली आहे, जेणेकरुन छोट्या व्यापाऱ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचणं सोपं होईल. यासाठी आम्ही पॅरेंट कंपनी फेसबुकची मदत घेणार आहे.
WhatsApp च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या अपडेटमुळे युजर्सची प्रायव्हसी संपुष्ठात येणार नाही. कंपनी आजही युजर्सच्या प्रायव्हसीबाबत वचनबद्ध आहे. नव्या अपडेटमुळे फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या डेटा शेअरिंगबाबत कोणताही बदल होणार नाही.
फेसबुक आपल्या सर्व प्रोडक्टसाठी वेळोवेळी अपडेट आणि नवी पॉलिसी आणत असतं. असंच नवं अपडेट फेसबुकने whatsapp मध्ये सामिल केलं आहे. WhatsApp यूजर्ससाठी जारी करण्यात आलेल्या, नव्या प्रायव्हसी पॉलिसीअंतर्गत आपल्या युजर्सचा आवश्यक डेटा फेसबुक दुसऱ्या कंपनीशी शेअर करेल.
ही माहिती शेअर होण्याची होती माहिती -
whatsapp, युजरचा नंबर, बँकिंग ट्रान्झेक्शन डेटा, सर्व्हिस रिलेटेड इन्फॉर्मेशन, दुसऱ्या कोणाशी इंटरॅक्ट करतात अशी माहिती, मोबाईल डिव्हाईस इन्फॉर्मेशन आणि आयपी अॅड्रेस शेअर करणार होता.
Popup Message -
सध्या whatsapp वापरताना फुल स्क्रिन पॉप-अप मेसेज येतो, ज्यात Accept करण्याचा पर्याय दिला जात आहे. ही कंपनीची नवीन टर्म आणि प्रायव्हसी पॉलिसी आहे, जी कंपनीने 4 जानेवारी रोजी जारी केली होती. नव्या नियम अटी अॅक्सेप्ट करण्यासाठी युजर्सकडे 8 फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे. नव्या पॉलिसी अॅक्सेप्ट न करणाऱ्या युजर्सचं whatsapp account डिलीट होईल.
WhatsApp New Policy -
- WhatsApp सर्व्हिस आणि डेटा प्रोसेसिंग
- फेसबुकच्या कंपन्या आणि सर्व्हिस WhatsApp चे चॅट स्टोअर करू शकतात
- फेसबुकच्या दुसऱ्या प्रोडक्टचं एकीकरण
It's important for us to be clear this update describes business communication and does not change WhatsApp’s data sharing practices with Facebook. It does not impact how people communicate privately with friends or family wherever they are in the world.
— Will Cathcart (@wcathcart) January 8, 2021
With end-to-end encryption, we cannot see your private chats or calls and neither can Facebook. We’re committed to this technology and committed to defending it globally. You can read more here: https://t.co/YpR5RaGoW1
— Will Cathcart (@wcathcart) January 8, 2021
WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत युजर्सकडे आता केवळ त्या पॉलिसीशी सहमत होण्याचा पर्याय आहे. फेसबुकच्या कंपन्यांमध्ये फेसबुक पेमेंट्स, WhatsApp, इन्स्टाग्राम, फेसबुक टेक्नोलॉजीज, ओनावो आणि क्राउड टेंगल सारख्या कंपन्या सामिल आहेत. कंपनीने आपल्या FAQ मध्ये इनहाउस कंपन्यांदरम्यान डेटा शेअरिंगबाबत डिटेलमध्ये माहिती शेअर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp, Whatsapp chat