• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • एखाद्याच्या मृत्यूनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचं अकाउंट्सचं काय होतं?

एखाद्याच्या मृत्यूनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचं अकाउंट्सचं काय होतं?

फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे, जो सर्वाधिक लोकांद्वारे वापरला जातो. मृत्यू झाल्यानंतर फेसबुकने काही विशेष नियम बनवले आहेत. हे अकाउंट कायमचं डिलीट केलं जाऊ शकतं किंवा एक आठवण म्हणूनही ते ठेवता येतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 4 मे: आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (Social media) जवळपास सर्वच जण असतात. सोशल मीडियावर नवे मित्र बनवले जातात, नवा अनुभव शेअर करतात, अनेक गोष्टींबाबत चांगली माहितीही मिळवता येते. पण कधी हा विचार केलाय का, की एखाद्या सोशल मीडिया युजरच्या मृत्यूनंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सचं काय होतं. फेसबुक (Facebook) - फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे, जो सर्वाधिक लोकांद्वारे वापरला जातो. मृत्यू झाल्यानंतर फेसबुकने काही विशेष नियम बनवले आहेत. हे अकाउंट कायमचं डिलीट केलं जाऊ शकतं किंवा एक आठवण म्हणूनही ते ठेवता येतं. फेसबुक अकाउंट एखाद्याच्या मृत्यूनंतर ते अकाउंट 'रिमेंबर' म्हणूनही ठेवलं जातं. त्याशिवाय फेसबुकला एक लीगल कॉन्ट्रॅक्टही पाठवावं लागेल, ज्यात युजरच्या मृत्यूनंतर त्याचं अकाउंट कोण हँडल करु इच्छित आहे, हे सांगावं लागतं. त्यानंतर फेसबुक एक कॉन्ट्रॅक्ट करतं आणि त्यात दिलेल्या सर्व नियमांचं पालन करावं लागतं. यूट्यूब (YouTube)- यूट्यूबवर लाखो-करोडो कमावणाऱ्यांची संख्या मोठी आहे.जर एखाद्या यूट्यूब अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला, तर अशावेळी यूट्यूबला एक लीगल कॉन्ट्रॅक्ट पाठवावं लागतं, ज्यात मृत्यूनंतर हे अकाउंट कोण हँडल करेल हे सांगावं लागतं. असं न केल्यास, यूट्यूब एका कालावधीनंतर अकाउंटचा वापर न झाल्याने ते बंद करतो.

  (वाचा - तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी Google अकाऊंटमधून काढून टाका हे अ‍ॅप, अन्यथा...)

  इन्स्टाग्राम (Instagram) - इन्स्टाग्रामच्या 90 टक्के पॉलिसी फेसबुकप्रमाणेच आहेत. फेसबुकप्रमाणेच अकाउंट पूर्णपणे बंद केलं जाऊ शकतं किंवा ते आठवणीच्या रुपातही ठेवता येतं. ट्विटर (Twitter) - ट्विटरवर एखाद्याच्या मृत्यूनंतर अकाउंट चालवण्याची कोणतीही पॉलिसी नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एखादा सदस्य अकाउंट डिलीट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो. कुटुंबातील सदस्याच्या रिक्वेस्टनंतर पोस्ट, फोटो आणि अकाउंट डिलीट केलं जातं. यासाठी मृत्यू प्रमाणपत्र द्यावं लागतं. मृत्यूनंतर किती काळ अ‍ॅक्टिव्ह राहतं अकाउंट? फेसबुकवर अकाउंट तोपर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहतं, जोपर्यंत मृत्यूची सूचना दिली जात नाही. लिंक्डिनवर मृत्यूची माहिती मिळताच अकाउंट बंद होतं. ट्विटर अकाउंट सहा महिन्यानंतर बंद होतं.
  Published by:Karishma
  First published: