जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / हवा तितका AC वापरुनही येईल कंट्रोलमध्ये वीज बिल, या 4 Tips मुळे होईल पैशांची मोठी बचत

हवा तितका AC वापरुनही येईल कंट्रोलमध्ये वीज बिल, या 4 Tips मुळे होईल पैशांची मोठी बचत

हवा तितका AC वापरुनही येईल कंट्रोलमध्ये वीज बिल, या 4 Tips मुळे होईल पैशांची मोठी बचत

एसीमुळे अधिक वीज बिल येत असल्याने अनेक जण एसी कमीत-कमी चालवण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही अशा टिप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही बिनधास्त एसी वापरू शकता. एसी अधिक काळ चालला तरी वीज बिल कमी येण्यास मदत होईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 मार्च : उन्हाळा सुरू झाला आहे. वातावरण थंड राहण्यासाठी अनेक घरात एसी (AC), कूलरचा (Cooler) वापर केला जातो. परंतु एसीमुळे अधिक वीज बिल येत असल्याने अनेक जण एसी कमीत-कमी चालवण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही अशा टिप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही बिनधास्त एसी वापरू शकता. एसी अधिक काळ चालला तरी वीज बिल कमी येण्यास मदत होईल. तुमच्या खोलीत एसी चालवण्याआधी खोलीच्या खिडक्या-दरवाजे ओपन करुन पंखा लावावा. एसी लावण्याआधी रुम वेंटिलेटेड झाला तर एसी लवकर कूलिंग करतो. त्यामुळे विज बील कमी येण्यास मदत होईल. AC लावून वीज बिल कमी यावं असं वाटत असेल, तर एसी ऑटो कूलिंग मोडवर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय हवं असल्यास एसी 20 मिनिटापर्यंत क्विक कूल मोडवर चालवा आणि त्यानंतर टेम्परेचर 24 डिग्रीवर सेट करा.

हे वाचा -  केवळ 1400 रुपयांत घरी आणता येईल AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील

एसीचं टेम्परेचर जितकं वाढवतो, प्रत्येक डिग्रीवर जवळपास 6 टक्के वीज बचत होते. या टेम्परेचरवर विजेची बचत होईल, तसंच 24 डिग्री ह्यूमन बॉडीसाठीही योग्य टेम्परेचर मानलं जातं.

हे वाचा -  नवा AC घेण्याचा विचार करताय? खरेदीआधी या गोष्टी लक्षात ठेवाच

एसी एक मशीन आहे त्यामुळे मशिन्सची वेळोवेळी दुरुस्ती करणं आवश्यक असतं. एसीचं वेळोवेळी सर्विसिंग करणं आवश्यक आहे. तुम्ही राहणाऱ्या ठिकाणी अधिक धूळ येत असेल, तर वर्षातून एकाहून अधिक वेळा सर्विस करू शकता. यामुळे चांगल्या कूलिंगसह विजेची बचतही होईल. घरातील तापमान वाढताच बहुतेक लोक एसी किमान तापमानावर 18 डिग्री सेल्सियसवर सेट करतात. असं केल्यानं खोली त्वरित थंड होईल, असा समज असतो. मात्र, खोली लवकर थंड करण्याची ही पद्धत प्रभावी नाही. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीनुसार (Bureau of Energy Efficiency), एअर कंडिशनरचं सरासरी तापमान 24 अंश सेल्सिअस असलं पाहिजे. हे तापमान मानवी शरीरासाठी योग्य आणि आरामदायक आहे. इतकंच नाही तर संशोधनानुसार एअर कंडिशनरमध्ये वाढलेल्या प्रत्येक डिग्री तापमानामुळे सुमारे सहा टक्के विजेची बचत होते. त्यामुळे वीज बिल कमी करण्यासाठी, एसीचं सरासरी तापमान 18 डिग्री सेल्सियसऐवजी 24 डिग्री सेल्सिअस ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात