Home /News /technology /

Aadhaar Data Base वर चीनचा सायबर हल्ला? अमेरिकेतल्या एजन्सीने दिली माहिती

Aadhaar Data Base वर चीनचा सायबर हल्ला? अमेरिकेतल्या एजन्सीने दिली माहिती

सर्व भारतीयांची माहिती असणाऱ्या ‘आधार’च्या डेटाबेसवर (Aadhaar database attacked) चिनी हॅकर्सनी हल्ला (Chinese hackers) केल्याचं समोर आलं आहे.

  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: सर्व भारतीयांची माहिती असणाऱ्या ‘आधार’च्या डेटाबेसवर (Adhaar database attacked) चिनी हॅकर्सनी हल्ला (Chinese hackers) केल्याचं समोर आलं आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयच्या (UIDIA database attacked) डेटाबेसमध्ये म्हणजे आधारकार्ड संबंधीच्या संस्थेकडे जवळपास एक अब्जाहून अधिक भारतीयांची माहिती ठेवण्यात आली आहे. त्यावर चिनी हॅकर्सनी हल्ला केल्याचं रेकॉर्डेड फ्युचर (Record Future) या सायबर सिक्युरिटी फर्मने म्हटलं आहे. या वर्षी जून आणि जुलैच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला होता. अर्थात, यातून कोणती माहिती चोरण्यात आली की नाही याबाबत कल्पना नसल्याचंही फर्मने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. सरकारने मात्र हा दावा फेटाळला आहे. अशा प्रकारचा कोणताही सायबर हल्ला झाल्याचं दिसून आलं नाही, असं सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. आधारचा डेटाबेस एन्क्रिप्टेड (Adhaar database encrypted) असून, केवळ सरकार आणि त्या-त्या वापरकर्त्यांनाच ही माहिती उपलब्ध असल्याचं यूआयडीएआयकडून स्पष्ट करण्यात आलं. आधारचा डेटाबेस अत्यंत सुरक्षित ठिकाणी आहे. तसंच, याची सिक्युरिटी सिस्टीमही वेळोवेळी अपग्रेड करण्यात येते, असंही सरकारी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आलं. 'एनडीटीव्ही'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. देशातलं अग्रगण्य मीडिया हाउस असलेल्या टाइम्स ग्रुपलाही (Times group attacked) चिनी हॅकर्सनी लक्ष्य केलं होतं असं रेकॉर्डेड फ्युचरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या वर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टदरम्यान टाइम्सच्या डेटाबेसवर (Times database cyber attack) हल्ला करण्यात आला होता; पण यातूनही कोणती माहिती चोरण्यात आली की नाही याबाबत माहिती नसल्याचं रेकॉर्डेड फ्युचरने स्पष्ट केलं आहे.

  Trojan Malware: सावधानी हटी दूर्घटना घटी! अँड्रॉइड वापरणाऱ्या बँक खातेधारकांनी राहा सावध, अन्यथा खातं होईल रिकामं

   बेनेट कोलमॅन अँड कंपनी लिमिटेड (Bennett Coleman & Co.) म्हणजेच टाइम्स ग्रुपचे मुख्य माहिती अधिकारी राजीव बात्रा यांनी हा दावा फेटाळला आहे. अशा प्रकारचा हल्ला झालाही असेल, तर तो आमच्या सायबर सिक्युरिटी यंत्रणेने परतवून लावला असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच, रेकॉर्डेड फ्युचरचा हा रिपोर्ट एवढा गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले.
  बोस्टनजवळ कार्यालय असलेल्या या कंपनीने ट्रॅफिक अॅनालिसिस डेटा आणि विविध डिटेक्शन टेक्निक्स वापरून आपल्याला या हल्ल्याची माहिती मिळवली. कंपनीने म्हटलं आहे, की हॅकर्सनी टाइम्स ग्रुपच्या कम्प्युटर नेटवर्कमध्ये मालवेअर सोडल्याचीही शक्यता आहे. याच्या मदतीने ते त्यांना हवं तेव्हा एखादी गोष्ट डिलीट करू शकतील. Phoneचोरी झाल्यास या Government Portalवर असा करा Block,सुरक्षित राहील तुमचा डेटा यासाठी हॅकर्सनी विन्नटी (Winnti) नावाचं मालवेअर वापरल्याची शक्यता असल्याचं रेकॉर्डेड फ्युचरने म्हटलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चीनमधले हॅकर्स हे मालवेअर वापरत आहेत. यासोबतच कोबाल्ट स्ट्राइक (Cobalt Strike) नावाचं एक टूलही या कामासाठी वापरण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. कंपनीचे लीड अॅनालिस्ट जॉनथन काँड्रा यांनी सांगितलं, की हे टूल जगभरातले कित्येक हॅकर्स वापरतात. हे टूल सर्वांना सहजरीत्या उपलब्ध आहे. त्यामुळेच हल्ला करणारे नेमक्या कोणत्या देशात आहेत याबाबत माहिती मिळवणं अवघड होतं. ... तर तुमचा फोन हॅक झाला असू शकतो रेकॉर्डेड फ्युचरने सांगितलं, की गेल्या वर्षभरात चीनमधून भारतात होत असलेल्या सायबर हल्ल्यांमध्ये 120 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सीमेवर झालेल्या चकमकीनंतर हे हल्ले वाढल्याचं (Cyber attacks on India) काँड्रा यांनी म्हटलं आहे. या वर्षी ऑगस्टनंतर या हल्ल्यांमध्ये 261 टक्के वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आधारच्या डेटाबेसमध्ये कोट्यवधी भारतीयांचा बायोमेट्रिक डेटा असल्यामुळे त्यावर हल्ला करण्यात आला. तसंच, टाइम्स ग्रुप सातत्याने भारत-चीन तणावावर बातम्या देत असल्यामुळे त्यांच्या डेटाबेसवर हल्ला करण्यात आला असावा, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
  First published:

  Tags: Aadhar card, Cyber crime

  पुढील बातम्या