जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता ऑनलाइन Driving licence सह 15 सुविधांसाठी लागणार Aadhar

आता ऑनलाइन Driving licence सह 15 सुविधांसाठी लागणार Aadhar

Driving Licence

Driving Licence

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं (Ministry of Road Transport and Highways) यासाठी नवीन नियम बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: अनेक ऑनलाईन सुविधांमध्ये सध्या आधारकार्ड (Aadhar card) सक्तीचं नाही. पण लवकरच अनेक सुविधांसाठी आधारकार्ड सक्तीचं होण्याची शक्यता आहे. लवकरच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (Driving Licence) देखील आधारकार्ड सक्तीचं होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय  (Ministry of Road Transport and Highways) यासाठी नवीन नियम बनवण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स (Online Driving Licence) नूतनीकरण, पत्ता बदलणं, वाहन रजिस्ट्रेशन आणि इंटरनॅशनल लायसन्ससाठी आधारकार्ड सक्तीचं नाही. पण यापुढे आता ड्रायव्हिंग लायसन्सबरोबरच 15 सुविधांसाठी आधारकार्ड सक्तीचं होणार आहे. परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवरून ऑनलाईन सर्व्हिसचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्हाला आधारकार्ड व्हेरिफाय करावं लागणार आहे. अन्यथा तुम्हाला स्थानिक आरटीओ कार्यालयात जाऊन हे काम करावं लागणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन आधार व्हेरिफाय केलं नाही तर तुम्हाला या वेबसाइटवरून सुविधेचा लाभ घेता येणार नाही. हे वाचा -  तीन दिवस बँका राहणार बंद; पुढील आठवड्यात संपामुळे कामकाज ठप्प होणार ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स ( Online Driving Licence) मिळवताना येणाऱ्या अडचणी यामुळे दूर होणार आहेत. परिवहन विभागाच्या ऑनलाईन वेबसाइटवरून आणखी 15 सुविधांचा लाभ घेण्यासाठी देखील आधारकार्ड व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. यासाठी नागरिकांकडून प्रतिक्रिया देखील मागवल्या आहेत. हे वाचा -  E aadhar card सह 35 सेवा मिळणार मोबाईलवर #mAadhaar App च्या माध्यमातून तुम्ही आधारकार्डसाठी अर्ज केला असेल आणि आधार क्रमांक नसेल तर तुम्ही यासाठी आधारकार्डच्या अर्जाच्या स्लीपचा वापर करू शकता. असं या मसुद्यात नमूद करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात