मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /E aadhar card सह 35 सेवा मिळणार मोबाईलवर #mAadhaar App च्या माध्यमातून

E aadhar card सह 35 सेवा मिळणार मोबाईलवर #mAadhaar App च्या माध्यमातून

आधार कार्डसंबंधीची सेवा मोबाईलवर मिळवायची असेल तर काय करायचं याची माहिती UIDAI ने जाहीर केली आहे. m-Aadhaar mobile app, आधार कार्ड वॉलेट (Aadhar Card wallet) विषय इथे वाचा. कसं कराल डाउनलोड?

आधार कार्डसंबंधीची सेवा मोबाईलवर मिळवायची असेल तर काय करायचं याची माहिती UIDAI ने जाहीर केली आहे. m-Aadhaar mobile app, आधार कार्ड वॉलेट (Aadhar Card wallet) विषय इथे वाचा. कसं कराल डाउनलोड?

आधार कार्डसंबंधीची सेवा मोबाईलवर मिळवायची असेल तर काय करायचं याची माहिती UIDAI ने जाहीर केली आहे. m-Aadhaar mobile app, आधार कार्ड वॉलेट (Aadhar Card wallet) विषय इथे वाचा. कसं कराल डाउनलोड?

    नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी :  आधार कार्ड (Aadhar Card) हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज मानला जातो. देशातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अनेक शासकीय कामांसाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे घराच्या पत्त्याचा पुरावा, केवायसी म्हणून वापरले जाते. आज प्रत्येक गोष्टींसाठी प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हे अनिवार्य आहे. आधार कार्ड (Aadhaar card) संबंधी सेवा आता मोबाइल application च्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यासंबंधी महत्त्वाची माहिती UIDAI ने आज दिली.

    संपूर्ण पडताळणी केल्यानंतर नागरिकांना आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (UIDAI) 12 अंकी ओळख किंवा आधार क्रमांक दिला जातो. कोणत्याही वयाचा, लिंगाचा भारतीय नागरिक आधार क्रमांक मिळवण्यासाठी नावनोंदणी करु शकतो. नावनोंदणीसाठी इच्छूक व्यक्तीला या प्रक्रियेसाठी डेमोग्राफिक आणि बायोमेट्रीक माहिती देणे बंधनकारक असते. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असते. आता ती मोबाईल अॅपच्या माध्यमातून mAadhaar app नावाने मिळणार आहे.

    महत्वाचा दस्तावेज असलेल्या या आधार कार्डाच्या अनुषंगाने सुमारे 35 सेवा या आता नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर मिळू शकतात. होय, आधार कार्डधारक सुमारे 35 सेवांचा लाभ आपल्या मोबाईलवर एम-आधार अॅपच्या (M-Aadhar APP) माध्यमातून घेऊ शकतो. या सेवा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्यावतीने (UDIAI) देण्यात येतात,

    या अॅपच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 35 सेवांमध्ये ई-आधारकार्ड डाऊनलोड करणे, जवळील आधार केंद्र शोधणे आदी सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

    हे वाचा - आधार अपडेट करायचं असेल तर आता घरबसल्या बुक करा अपॉइंटमेंट, वाचा सविस्तर

    युआयडीएआयने केलेल्या व्टीटनुसार, एम – आधार अॅप हे एक प्रकारे आधार कार्ड वॉलेट (Aadhar Card wallet) आहे. परंतु, या अॅपवर युझर्सला आधार कार्डावरील आपले नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक अशी संख्याशास्त्रीय माहिती अपडेट करण्याची सुविधा मिळणार नाही.

    हे वाचा - आधारशी लिंक मोबाइल क्रमांक विसरला असाल तरी नो टेन्शन! अशाप्रकारे मिळेल माहिती

    परंतु, एम- आधारचा वापर युझर्स भारतात कोठेही आणि केव्हाही करु शकणार आहेत. रेल्वे स्टेशन्स, एअऱपोर्टवर एम – आधार प्रोफाईल ही आयडी फ्रुफ म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच भारतीय नागरिक या अॅपमधील ई-केवायसी आणि क्यूआर कोड या फिचर्सचा वापर करुन आधार व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करीत विविध सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहेत.

    असं वापरता येईल mAadhaar App

    ज्या व्यक्तींनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी कनेक्ट केले आहे, ते एम-आधार अॅपवर आधार प्रोफाईल तयार करु शकतात. तसेच ही प्रोफाईल कोणत्याही स्मार्टफोनच्या माध्यमातून रजिस्टर करता येणार आहे. त्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमाकांवर ओटीपीवर पाठवला जाईल. अॅण्ड्राईड युझर्सना https://tinyurl.com/yx32kkeq या लिंकवर क्लिक करुन हे अप डाऊनलोड करता येईल तर आयफोन युझर्सना  https://tinyurl.com/taj87tg या लिंकवर क्लिक करुन एम-आधार अॅप डाऊनलोड करता येईल.

    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card on phone, Digital services, Identity verification, M aadhar card