नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: आधार कार्डशिवाय (Aadhaar Card) कोणतंही सरकारी काम करता येत नाही. आधारच्या सर्विसेजबाबत UIDAI आपल्या ग्राहकांना सतत अलर्ट करत असतं. जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील किंवा तुमचं हरवलेलं आधार कार्ड पुन्हा मिळवायचं असल्यास ऑनलाइन सुविधेद्वारे तुम्हाला हा फायदा मिळतो. परंतु काही सेवा अशा आहेत, ज्यासाठी तुम्हाला Common Services Centers (CSC) जावं लागतं. आधारमध्ये बदल करताना या गोष्टींसाठी द्यावा लागतो चार्ज - आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI आधार कार्ड देताना 50 रुपये चार्ज घेते. तसंच आधारमध्ये अपडेटसाठी वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळा चार्ज द्यावा लागतो. जर तुम्ही तुमचं बायोमेट्रिक अपडेट करत असाल, तर 50 रुपये फी घेतली जाते. त्याशिवाय डेमोग्राफिकची कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी 50 रुपये घेतले जातात.
हे वाचा - Aadhaar Update:युजर्ससाठी मोठी बातमी, आधार अपडेटसाठी नवी सर्विस; UIDAI ची माहिती
जर एखादा व्यक्ती पुन्हा आधार कार्ड घेत असेल, तर त्याला चार्ज द्यावा लागतो. पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhar Card) साठी 50 रुपये चार्ज घेतला जातो. मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठीही 50 रुपये भरावे लागतात. तसंच KYC करण्यासाठी UIDAI कडून 30 रुपये घेतले जातात. वरील कोणत्याही कामासाठी तुमच्याकडे कोणी अधिक पैसे मागत असेल, तर 1947 वर कॉल करुन तक्रार करू शकता. किंवा help@uidai.gov.in या वेबसाइटवरही तुमची तक्रार दाखल करू शकता.
हे वाचा - वर्षभरापूर्वी आलेला FASTag आता बंद होणार? पुन्हा बदलणार Toll Collection ची पद्धत
आधारच्या या सेवा मोफत - आधार कार्डमध्ये काही अपडेट करण्यासाठी पैसे घेतले जात नाहीत. आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता ऑनलाइन बदलता येतो. यासाठी पैसे भरावे लागत नाहीत. तसंच आधारची ई-कॉपी घेत असाल, तरीही यासाठी कोणताही चार्ज भरावा लागत नाही. तसंच एनरोलमेंट नंबर आणि पहिल्यांदा बायोमेट्रिक माहिती अपडेट करताना कोणताही चार्ज द्यावा लागत नाही.