ही कंपनी केवळ टोस्टर विकते 25000 रुपयांना, आता लाँच करणार 5G फोन; विचार करा किती असेल किंमत

ही कंपनी केवळ टोस्टर विकते 25000 रुपयांना, आता लाँच करणार 5G फोन; विचार करा किती असेल किंमत

ब्रेड भाजायचा टोस्टर (Toaster) अनेक घरांत असतो. त्याची किंमत जास्तीत जास्त किती असते? अगदी ब्रँडेड टोस्टर घ्यायचा झाला, तरी चार-पाच हजार रुपयांच्या बाहेर जात नाही; पण जपानच्या या ब्रँडची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल

  • Share this:

मुंबई, 15 मे: ब्रेड भाजायचा टोस्टर (Toaster) अनेक घरांत असतो. त्याची किंमत जास्तीत जास्त किती असते? अगदी ब्रँडेड टोस्टर घ्यायचा झाला, तरी चार-पाच हजार रुपयांच्या बाहेर जात नाही. पण जपानच्या बाल्मुडा (Balmuda) या कंपनीच्या टोस्टरची किंमत किती आहे माहिती आहे का? तब्बल 329 डॉलर म्हणजे सुमारे 25 हजारांच्या आसपास. ही कंपनी घरातील उपकरणे आि डिझाइनमध्ये स्पेशालिस्ट आहे. लक्झरी श्रेणीतल्या घरगुती वापराच्या (Luxury Home Appliances) उपकरणांची निर्मिती करते आणि जगभरातल्या निवडक बाजारपेठांमध्ये विक्री करते. त्यात स्पीकर्स, एअर प्युरिफायर्स वगैरेंचा समावेश आहे; पण त्यात सर्वाधिक लोकप्रिय आहे तो त्यांचा टोस्टर. डिझाइनमध्ये असलेलं आपली तज्ज्ञता आता या कंपनीने स्मार्टफोनमध्येही आजमावून पाहायचं ठरवलं आहे. ही कंपनी स्मार्टफोन निर्मिती करणार असल्याचं वृत्त 'दी व्हर्ज'ने दिलं आहे.

नजीकच्या भविष्यकाळात बाल्मुडा कंपनी स्मार्टफोन (5G Smartphone) तयार करून त्यांची विक्री करणार आहे. या स्मार्टफोनचं उत्पादन करण्यासाठी या कंपनीने जपानमधल्या कायोसेरा (Kyocera) या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडशी करार केला आहे. तसंच, सॉफ्टबँक (SoftBank) या कंपनीशी या फोन्सच्या विक्रीबद्दलचा करार करण्यात आला आहे. याबद्दलचा आणखी कोणताही तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तसंच, फोनची अंदाजे किंमत किती असेल, याबद्दलही काही सांगण्यात आलेलं नाही; मात्र ज्या कंपनीचा टोस्टरही 25 हजार रुपयांचा असतो, तिथे स्मार्टफोनही स्वस्त असण्याची अजिबात शक्यता नाही.

हे वाचा-Google Pay चं मोठं पाऊल; आता अमेरिकेतूनही भारतात गुगल पेद्वारे पैसे पाठवता येणार

अद्वितीय प्रकारचं डिझाइन असलेल्या वस्तूंची महागड्या किमतीला विक्री करणारी बाल्मुडा ही काही एकमेव कंपनी नव्हे. स्टीव्ह जॉब्ज यांच्या अॅपल (Apple) या कंपनीने प्रीमिअम डिझाइन फिलॉसॉफी हेच मूलभूत तत्त्व ठेवलं. आज जगातल्या सर्वांत प्रभावी कंपन्यांपैकी ती एक आहे. डायसन ही कंपनीदेखील महागडी घरगुती आणि पर्सनल केअर उपकरणं बनवते. ती दिसायला अत्यंत साधी असतात, पण त्यांची कार्यपद्धती विलक्षण असते. बाल्मुडा कंपनी टोस्टर अद्याप भारतात विकत नाही; पण त्या टोस्टरच्या फोटोजवरून त्याच्या डिझाइनचा आणि कार्यपद्धतीचा अंदाज बांधता येतो.

हे वाचा-गेम लाँच होण्याआधीच फेक लिंक Viral,डाऊनलोड केला असेल तर तुमचा खासगी डेटा धोक्यात

असं असलं तरीही, आतापर्यंत अनेक बड्या कंपन्यांनी असे डिझाइन सेंट्रिक स्मार्टफोन्स तयार करण्याचे प्रयत्न केले; पण ते केवळ एकदाच करण्यात आले. त्यांची सातत्यपूर्ण निर्मिती करण्यात आली नाही. लँबोर्घिनी, पोर्श्चे यांसारख्या कंपन्यांचे टॅग ह्यूअर मेरिडिस्ट, द गोल्डविश ल मिलियन असे फोन्स केवळ मिरवण्यापुरतेच होते. बाल्मुडाही तशाच फोन्सची निर्मिती करणार आहे, की कसे याबद्दल नेमकी माहिती नाही.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 15, 2021, 1:03 PM IST

ताज्या बातम्या