Home /News /technology /

चक्क 'Apple Watch' मुळे वाचला तरुणाचा जीव, वाचा नेमकं काय घडलं

चक्क 'Apple Watch' मुळे वाचला तरुणाचा जीव, वाचा नेमकं काय घडलं

अ‍ॅपल (Apple) स्मार्टवॉच (Smartwatch) त्याच्या विविध वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: त्यातील आरोग्य विषयक सुविधा तर अत्यंत अद्ययावत आणि अनोख्या आहेत.

    मुंबई, 19 मार्च-  अ‍ॅपल (Apple) स्मार्टवॉच (Smartwatch) त्याच्या विविध वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: त्यातील आरोग्य विषयक सुविधा तर अत्यंत अद्ययावत आणि अनोख्या आहेत. हे स्मार्टवॉच वापरणाऱ्या अनेकांना याचा अत्यंत गंभीर परिस्थितीत वेळेत उपचार मिळवून देण्यात मदत मिळाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जगप्रसिद्ध अ‍ॅपल (Apple) कंपनी आपल्या अशा अत्यंत प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आयफोन्स (i phones) आणि स्मार्टवॉचसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक वेळा या अ‍ॅपल (Apple) स्मार्टवॉचने त्याच्या मालकावर ओढवलेल्या जीवघेण्या आपत्तीचा अचूक अंदाज घेऊन आपत्कालीन सेवांना (Emergency Services ) सूचना देऊन त्यांचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे हे स्मार्टवॉच वापरण्याकडे अनेकांचा ओढा वाढत आहे. आपल्या देशातही या स्मार्टवॉचचे असंख्य चाहते असून, त्याचा वापर वाढत आहे. अलीकडेच या स्मार्टवॉचमुळे हरियाणातील (Haryana ) एका दंतचिकित्सकाचा (Dentist) जीव वाचल्याची घटना घडली आहे. यामुळे या स्मार्टवॉचचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ही सत्य घटना आहे, हरियाणातील यमुनानगर इथल्या नितेश चोप्रा दंतचिकित्सकाची (Dentist). चोप्रा यांनी गेल्या वर्षी आपल्या पत्नीला अ‍ॅपल (Apple) स्मार्टवॉच सीरिज 6 (Series 6) भेट दिलं होतं. अलीकडेच चोप्रा यांना छातीत दुखू लागल्यानं आणि त्यांच्या पत्नीने त्यांना अ‍ॅपल वॉचवर ( Apple Watch) ईसीजी (ECG) घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार चोप्रा यांनी या वॉचमधील याबाबतच्या सुविधेचा वापर करून ईसीजी काढला. त्यामध्ये त्याम्ना अडथळे दिसून आले. तेव्हा ते तत्काळ हॉस्पिटलमध्ये गेले. तिथं चोप्रा यांची तातडीनं अँजिओग्राफी (Angiography) करण्यात आली. त्यात चोप्रा यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये 99.9 टक्के अडथळा असल्याचं दिसून आलं. त्यांच्यावर तातडीनं स्टेंट टाकून अडथळे दूर करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानन्तर चोप्रा खडखडीत बरे होऊन घरी आले. या सगळ्याचा प्रसंगाची आठवण सांगताना चोप्रा यांच्या पत्नी नेहा चोप्रा आवर्जून अ‍ॅपल (Apple) स्मार्टवॉचचे आभार मानतात. ही आठवण सांगताना त्या म्हणाल्या, 'आम्ही भाग्यवान आहोत, की काहीही वाईट घडण्यापूर्वी आम्हाला या वॉचने वाचवले. माझे पती अवघे तिशीचे आहेत. त्यांना असा काही गंभीर आजार असेल असा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. केवळ या स्मार्टवॉचमुळे वेळेत आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो'. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक (tim Cook )यांना ईमेल लिहून नेहा यांनी आपल्या पतीचा जीव वाचवणाऱ्या या अभिनव तंत्रज्ञानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. 'तुम्ही दिलेल्या तंत्रज्ञानामुळेच आम्ही वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्यामुळे माझ्या पतीचे प्राण वाचले. आता त्याची तब्बेत अगदी उत्तम आहे.माझ्या पतीला त्याचे जीवन दिल्याबद्दल धन्यवाद! (हे वाचा:Apple iPhone SE 2022 आणि आयपॅड Air 2022चा भारतात पहिला सेल, मिळतोय मोठा discount ) नेहा चोप्रा यांनी लिहिलेल्या ईमेलची अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी आवर्जून दखल घेतली आणि त्यांच्या ईमेलला उत्तरही दिले. नेहा यांनी आवर्जून ही गोष्ट शेअर केल्याबद्दल आभार मानले. 'तुमची कथा आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. मला खूप आनंद झाला की तुम्हाला वेळेत वैद्यकीय मदत आणि आवश्यक उपचार मिळाले.लवकर बरे व्हा. तुम्हाला चांगले आरोग्य लाभो. टिम,' असं टीम कुक यांनी नेहा चोप्रा यांच्या ईमेलला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. आजवर जगभरात अनेक ठिकाणी स्मार्ट वॉचच्या अशा उपयोगाच्या घटना घडल्या आहेत.अ‍ॅपल कंपनीनं नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाच्या पुढं एक पाऊल राहण्यावर भर दिला आहे. आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
    First published:

    Tags: Technics, Technology

    पुढील बातम्या