मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /जरा ई-मेल 'बॉक्स'मधून बाहेर पडा; Gmail चे हे स्पेशल फिचर्स बरंच सोपं करतील तुमचं काम

जरा ई-मेल 'बॉक्स'मधून बाहेर पडा; Gmail चे हे स्पेशल फिचर्स बरंच सोपं करतील तुमचं काम

जी-मेलमध्ये अनेक खास फीचर्स आहेत पण सर्वच फीचर्स युझर्सला माहिती नसतात.

जी-मेलमध्ये अनेक खास फीचर्स आहेत पण सर्वच फीचर्स युझर्सला माहिती नसतात.

जी-मेलमध्ये अनेक खास फीचर्स आहेत पण सर्वच फीचर्स युझर्सला माहिती नसतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 25 ऑगस्ट : ई-मेल (Email) म्हटलं की जी-मेल (Gmail) हे समीकरण पाहायला मिळतं. शाळा, कॉलेजपासून ते बहुतांश ऑफिसेसमध्ये कामासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर होतो. स्मार्टफोन युझर्सदेखील जी-मेल अकाउंटचा वापर करतात. नवीन अ‍ॅप्स, डिजिटल प्लॅटफॉर्म, बॅंकिंगशी संबंधित ऑनलाइन सुविधा (Online Facilities) जी-मेलशी जोडलेल्या असतात. जी-मेलमध्ये अनेक खास फीचर्स आहेत; पण सर्वच फीचर्स (Features) युझर्सला माहिती नसतात.

    जी-मेलमध्ये असलेल्या आणि बऱ्याच जणांना माहिती नसलेल्या फिचर्सपैकी काही फिचर्स म्हणजे ई-मेल शेड्यूलिंग, प्रीव्ह्यू पॅनेल आणि स्नूझ मेल. हे फिचर्स बऱ्याच कामाचे आहेत. आता या फिचर्सचा नेमका वापर काय आणि ते कसं वापरायचं ते पाहूया.

    स्नूझ ई-मेल - जी-मेलमधल्या या फीचरच्या मदतीनं तुम्ही कमी महत्त्वाचे ई-मेल्स स्नूझ करू शकता. याचाच अर्थ तुम्ही जे ई-मेल स्नूझ केले आहेत, ते काही काळानंतर किंवा दिवसांनंतर गायब होतात. तुम्ही हे ई-मेल्स स्नूझ सेक्शनमध्ये जाऊन पाहू शकता. बऱ्याचदा काही कालावधीनंतर स्नूझ केलेले ई-मेल्स तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये पुन्हा दिसू लागतात.

    हे वाचा - Google क्रोम वापरत असाल तर सावधान! केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

    जी-मेल प्रीव्ह्यू पॅनेल (Gmail Preview Panel) - जी-मेलवरच्या या फीचरच्या मदतीनं तुम्ही एका वेळी अनेक मेल्स वाचू शकता. हे फीचर सुरू केल्यानंतर इनबॉक्स दोन भागांत विभागला जातो. यापैकी एका भागात ई-मेलची लिस्ट दिसते, तर दुसऱ्या भागात क्लिक्ड ई-मेलचा समावेश असतो. याचाच अर्थ एकाच स्क्रीनवर तुम्ही ई-मेलची लिस्ट आणि त्यामध्ये लिहिलेला मजकूर पाहू शकता. तुम्ही या लिस्टमधून मेल सहजपणे निवडू शकता आणि एक एक करून वाचू शकता. हा पॅनेल ओपन करण्यासाठी तुम्हाला जी-मेल लॅबमध्ये जाऊन कॉग हा ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन प्रीव्ह्यू पॅनेल सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दोन वेगवेगळ्या स्लाइड्स (Slides) दिसू लागतील.

    हे वाचा - Netflix लॉन्च करणार क्लाउड गेमिंग सर्व्हिस; भरती प्रक्रिया सुरू!

    ई-मेल शेड्यूल (Email Schedule) - या फीचरच्या मदतीनं तुम्ही हवा तो ई-मेल शेड्यूल करू शकता. समजा तुम्हाला सकाळी सहा वाजता एखादा ई-मेल पाठवायचा असेल तर तो तुम्ही आदल्या दिवशी रात्री वेळ आणि तारखेसह शेड्यूल करू शकता. तुम्ही दिलेली तारीख आणि वेळेला हा ई-मेल आपोआप सेंड होतो. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला डाउन अ‍ॅरोवर टॅप करून शेड्यूल सेंड या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर प्रीसेटच्या ऑप्शनवर क्लिक करून तारीख आणि वेळ सिलेक्ट करावी लागेल. यानंतर `पिक डेट अँड टाइम` या ऑप्शनवर क्लिक करून ई-मेल शेड्यूल करता येईल. ही तिन्ही फीचर्स जी-मेल युझर्ससाठी खूप उपयुक्त ठरणारी आहेत. यामुळे ई-मेलविषयीची कामं सहज-सुलभ होतात.

    First published:
    top videos

      Tags: Gmail, Tech news, Technology