मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Netflix लॉन्च करणार क्लाउड गेमिंग सर्व्हिस; भरती प्रक्रिया सुरू!

Netflix लॉन्च करणार क्लाउड गेमिंग सर्व्हिस; भरती प्रक्रिया सुरू!

Netflix युजर्स शेअर करू शकणार नाहीत पासवर्ड, भरावं लागेल अतिरिक्त शुल्क

Netflix युजर्स शेअर करू शकणार नाहीत पासवर्ड, भरावं लागेल अतिरिक्त शुल्क

अलीकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची (OTT Platforms) लोकप्रियता वेगानं वाढतं आहे. नेटफ्लिक्सने (Netflix) यात पुढचं पाऊल टाकण्याचं नियोजन केलं आहे. नेटफ्लिक्स लवकरच क्लाउड गेमिंग सुविधा (Cloud Gaming Service) सुरू करणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 24 ऑगस्ट : अलीकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची (OTT Platforms) लोकप्रियता वेगानं वाढतं आहे. घरबसल्या किंवा कुठेही मनोरंजन साध्य होत असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग वळाला आहे. बहुतांश ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेब सीरिज, चित्रपट आणि सीरियल्सचा आनंद प्रेक्षकांना घेता येतो. नेटफ्लिक्सने (Netflix) यात पुढचं पाऊल टाकण्याचं नियोजन केलं आहे. नेटफ्लिक्स लवकरच क्लाउड गेमिंग सुविधा (Cloud Gaming Service) सुरू करणार असून, त्याकरिता नेटफ्लिक्सने तंत्रज्ञांची भरतीप्रक्रिया (Recruitment) सुरू केली आहे.

    स्ट्रिमिंग जायंट (Strimming Giant) नेटफ्लिक्सने क्लाउड गेमिंगचं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. यासाठी कंपनी सोनी प्लेस्टेशन नाउ, गुगल स्टॅडिया, अ‍ॅपल आर्किड आणि अ‍ॅमेझॉन ल्युनासारखी क्लाउड गेमिंगची सुविधा ग्राहकांना लवकरच उपलब्ध करून देणार आहे. यासाठी नेटफ्लिक्सने प्रोफेशनल्सचा (professionals) शोध सुरू केला आहे.

    `प्रोटोकॉल`ने दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स क्लाउड गेमिंगची आव्हानं हाताळण्याचा अनुभव असलेल्या सुरक्षा उत्पादक व्यवस्थापकांचा (Security Product Managers) शोध घेत आहे. या इंजिनीअरचं प्रामुख्याने नेटफ्लिक्सच्या क्लाउड गेमिंग सेवा आणि अन्य पदांना सपोर्ट करणं हे काम असेल.

    नेटफ्लिक्स हा प्लॅटफॉर्म व्हिडिओ गेम करिता वेगानं काम करत आहे. गेल्या नोव्हेंबरपासून कंपनी प्लॅटफॉर्मवर शो रिलीज दरम्यान युजर्सला व्यस्त ठेवण्यासाठी गेम्स रोलआउट (Rollout) करत आहे. ज्या युजर्सनं स्वतंत्र अ‍ॅप डाउनलोड केलं आहे, अशा सदस्यांनाच या गेम्सचा आनंद घेता येणार आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या सर्वांत मोठ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये एपिक गेम्स (Epic Games) आणि टिकटॉकला (Tik Tok) समाविष्ट केलं आहे.

    नेटफ्लिक्सने अलीकडेच `इन टू द ब्रीच` (Into the Breach) आणि बिफोर युवर आईज (Before Your Eyes) सारख्या मोबाईल गेम्स (Mobile Games) लॉंच केल्या आहेत. तथापि, एक टक्क्याहून कमी ग्राहक या मोबईल गेम्स खेळतात. नेटफ्लिक्स वर्षाच्या अखेरीस किमान 50 गेमिंग टायटल्स लॉंच करण्याची योजना आखत आहे. अ‍ॅपटोपिया या अ‍ॅप अ‍ॅनालिटिक्स कंपनीच्या अंदाजानुसार, दररोज सरासरी 1.7 दशलक्ष लोक गेम खेळण्यात व्यस्त असतात. मात्र ही संख्या नेटफ्लिक्सच्या 221 दशलक्ष सदस्यांच्या तुलनेत एक टक्क्यापेक्षा कमी आहे. नेटफ्लिक्सच्या `स्ट्रेंजर थिंग्ज` या थीम्ड गेमने विशेषतः चांगली कामगिरी केली आहे.

    नेटफ्लिक्सचे मोबाईल गेम्स फारसे लोकप्रिय नसले तरी, क्लाउड गेमिंग सेवेला विशेषतः तरुण गेमर्सकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. नेटफ्लिक्स साठी क्लाउड गेमिंग खूप अर्थपूर्ण आहे. केवळ गेम कन्सोलवर अवलंबून राहता कंपनी त्यांच्या गेम्स टीव्ही स्क्रिनवर आणण्याची परवानगी देणार नाही तर क्लाउड गेम्सच्या माध्यमातून नेटफ्लिक्सला कौटुंबिक वातावरण तयार करायचं आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Netflix