Home /News /technology /

छोट्या गॅरेजमधून सुरू झालेल्या 'Apple' ची मोठी झेप; 3 ट्रिलियन मार्केट व्हॅल्यू असलेली जगातील पहिली कंपनी

छोट्या गॅरेजमधून सुरू झालेल्या 'Apple' ची मोठी झेप; 3 ट्रिलियन मार्केट व्हॅल्यू असलेली जगातील पहिली कंपनी

1976 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये एका गॅरेजमध्ये सुरू झालेली ही कंपनी आता 3 ट्रिलियन डॉलरची झाली आहे. या मोठ्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी 42 वर्षांचा मोठा प्रवास करावा लागला.

  न्यूयॉर्क, 4 जानेवारी : अमेरिकी टेक कंपनी Apple च्या मार्केट व्हॅल्यूमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. सोमवारी Apple ने 3 ट्रिलियन डॉलर जवळपास 3 लाख कोटी डॉलर मार्केट व्हॅल्यूचे जबरदस्त आकडे पार केले आहेत. वॉलमार्ट, डिज्नी, नेटफ्लिक्स, नायकी, एक्सॉन, मोबिल, कोका-कोला, कॉमकॉस्ट, मॉर्गन स्टेनली, मॅकडॉनल्ड्स, बोइंग, आयबीएम आणि फोर्ड सारख्या जगातील मोठ्या कंपन्यांची नावं तुमच्या ऐकण्यात असतील. जगातील या पॉप्युलर कंपन्यांना एकत्र मिळूनही Apple ची मार्केट व्हॅल्यू कितीतरी अधिक आहे. ही जगातील पहिली publicly traded company आहे, जिने इतकी मोठी मजल मारली आहे. कंपनीने शेअर सोमवारी 182.01 डॉलरवर ट्रेड करत होते. केवळ 16 महिन्यात 2 ते 3 ट्रिलियन डॉलर व्हॅल्यू - 1976 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये एका गॅरेजमध्ये सुरू झालेली ही कंपनी आता 3 ट्रिलियन डॉलरची झाली आहे. Apple ने ऑगस्ट 2018 मध्ये एक ट्रिलियन डॉलरचा आकडा पार केला होता. या मोठ्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी 42 वर्षांचा मोठा प्रवास करावा लागला. दोन वर्षात कंपनीची व्हॅल्यू 2 ट्रिलियन डॉलरहून अधिक झाली. त्यानंतर पुढे तीन ट्रिलियन मार्केट व्हॅल्यू होण्यासाठी कंपनीला केवळ 16 महिने आणि 15 दिवस लागले.

  Google Payवर सोनं खरेदी-विक्रीची संधी, ऑनलाईन ट्रान्झेक्शनसाठी पाहा सोपी प्रोसेस

  30 जनरल इलेक्ट्रिक्स कंपनीइतकी व्हॅल्यू - 3 ट्रिलियन हा आकडा अतिशय मोठा आहे. हा जगातील सर्व क्रिप्टोकरेंसीच्या किंमतीहून अधिक आहे. हा आकडा सहा जेपी मॉर्गन चेज, सर्वात मोठी अमेरिकन बँक किंवा 30 जनरल इलेक्ट्रिक्स कंपनीइतका आहे. इंडेक्समद्ये व्हॅल्यूएशन पाहणारे एक विश्लेषक हॉवर्ड सिल्वरब्लॅटनुसार, Apple आता संपूर्ण जगातील शेअर बाजारातील (global stock markets) व्हॅल्यूच्या जवळपास 3.3 टक्के आहे.

  OLX, ऑनलाइन शॉपिंग साइटवर UPI Payment करताना Alert, या फ्रॉड ट्रिक्सपासून सावधान

  जाणकारांनी दिलेल्या बाजारातील आकडेवारीनुसार, आणखी एक पॉप्युलर टेक कंपनी Microsoft यावर्षाच्या सुरुवातीला Apple च्या 3 ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये सामिल होऊ शकते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Iphone, Tech news

  पुढील बातम्या