Home /News /technology /

धमाकेदार ऑफर्स! 20 रुपयांहूनही कमी किमतीत मिळतोय 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

धमाकेदार ऑफर्स! 20 रुपयांहूनही कमी किमतीत मिळतोय 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

टेलिकॉम कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे अनेक कंपन्यांनी कमी दरात इंटरनेट (internet) उपलब्ध करण्यासाठी अनेक रिचार्ज प्लॅन्स (Recharge Plans) जारी केले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये (telecom company) सतत चढाओढ आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 28 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ऑफिसेसकडून आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम (Work from Home) देण्यात आलं आहे. त्यातच टेलिकॉम कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे अनेक कंपन्यांनी कमी दरात इंटरनेट (internet) उपलब्ध करण्यासाठी अनेक रिचार्ज प्लॅन्स (Recharge Plans) जारी केले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये (telecom company) सतत चढाओढ आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio), एयरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea) आणि BSNL सारख्या दिग्गज कंपन्यांनी आपल्या युजर्ससाठी स्वस्त दरातील प्लॅन लाँच केले आहेत. एयरटेल 19 रुपये प्रीपेड प्लॅन - एयरटेलने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त किंमतीतील रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा 19 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. याची वॅलिडिटी दोन दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 200MB डेटा दिला जातो. तसंच यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. वोडाफोन-आयडिया - वोडाफोन-आयडियाचाही 19 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. यात युजर्सला 200MB डेटा मिळत असून याची वॅलिडिटी दोन दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा आहे.

  (वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत)

  जिओ 11 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - रिलायन्स जिओने 20 रुपयांहून कमी किंमतीचा प्लॅन ऑफर केला आहे. यात युजर्सला 1 GB डेटा मिळतो. याची वॅलिडिटी युजर्सच्या वापरावर अवलंबून आहे.

  (वाचा - ...तर WhatsApp ग्रुपचा अ‍ॅडमिन जबाबदार नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय)

  BSNL - देशाची सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचा (BSNL) 18 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. याची वॅलिडिटी दोन दिवसांची आहे. यात युजर्सला दररोज 1GB डेटा मिळतो. दोन दिवसांसाठी युजर्सला दोन जीबी डेटा मिळतो. तसंच अनलिमिटेड वॉईस कॉलिंगची सुविधा असून 100 SMS फ्री देण्यात आले आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Airtel, BSNL, Recharge, Reliance Jio, Reliance Jio Internet, Vodafone idea tariff plan

  पुढील बातम्या