• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • मुलं मोबाईलवर काय पाहतात? पालकांना ठेवता येणार लक्ष; YouTube चं नवं फीचर

मुलं मोबाईलवर काय पाहतात? पालकांना ठेवता येणार लक्ष; YouTube चं नवं फीचर

पालकांसाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाउंटच्या (Supervised Google Account) माध्यमातून, आपल्या मुलांच्या यूट्यूब अकाउंटपर्यंत पालकांचा अ‍ॅक्सेस असेल. त्यामुळे त्यांची मुलं काय बघतात यावर पालक प्रतिबंध लावू शकतील.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) आपल्या युजर्सला नेहमी चांगला अनुभव देण्याच्या प्रयत्नात असतं. आता कंपनीने एका खास फीचरची घोषणा केली आहे. कंपनीच्या या फीचरमुळे पालक आता या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी रेस्ट्रिक्शन्स अर्थात प्रतिबंध लावू शकणार आहेत. कंपनीने एका ब्लॉगमध्ये सांगितलं की, सुरुवातीला हे फीचर बीटा टेस्टरसाठी जारी केलं जाईल. पालकांसाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाउंटच्या (Supervised Google Account) माध्यमातून, आपल्या मुलांच्या यूट्यूब अकाउंटपर्यंत पालकांचा अ‍ॅक्सेस असेल. त्यामुळे त्यांची मुलं काय बघतात यावर पालक प्रतिबंध लावू शकतील. नव्या फीचरसाठी कंपनी तीन वेगवेगळ्या सेटिंग्स जारी करेल. सूपर्वाईज्ड गुगल अकाउंट या तीन सेटिंग्स एडजस्ट करण्यासाठी पालकांना देईल. 1. Explore (एक्सप्लोर) - ही सेटिंग त्या मुलांसाठी आहे ज्यांचं वय 9 वर्षाहून अधिक आहे. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये व्लॉग्स, ट्यूटोरियल, गेमिंग, व्हिडीओज, म्यूजिक क्लिप, न्यूजचा समावेश असेल.

  (वाचा - Facebook, Twitter सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नव्या गाईडलाईन्स; Whatsapp वर होणार सर्वाधिक परिणाम)

  2. Explore more (एक्सप्लोर मोर) - ही सेटिंग 13 वर्षाहून अधिक वयोगटासाठी आहे. ही सेटिंग इनेबल केल्यावर व्ह्यूवर्सकडे व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह स्ट्रीमही अ‍ॅक्सेस करता येईल. 3. Most of YouTube (मोस्ट ऑफ यूट्यूब) - या सेटिंगमध्ये मुलं यूट्यूबवर जवळपास सर्वच व्हिडीओ पाहू शकतील. मुलं केवळ Age Restrictions वाले संवेदनशील व्हिडीओ पाहू शकणार नाहीत. यूट्यूबने नवं फीचर जारी केलं असताना, दुसरीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला कोणत्याही आक्षेपार्ह कंटेंटची समस्या असल्यास, त्याला 36 तासांच्या आत ती पोस्ट हटवावी लागेल. तसंच या प्लॅटफॉर्म्सना भारतीय कायद्यांचं पालन करावं लागणार आहे.
  Published by:Karishma
  First published: