नवी दिल्ली, 26 एप्रिल: देशभरात वेगाने वाढणाऱ्या कोरोना संकटाच्या काळात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोरोनामुळे भारतात निर्माण झालेली गंभीर स्थिती पाहता त्यांनी 135 कोटी रुपयांच्या रिलीफ फंडची घोषणा केली आहे. त्याशिवाय मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी भारताला मदत करण्यासाठी प्रयत्नशील असून ऑक्सिजन उपकरणंही खरेदी करण्यासाठी मदत करणार असल्याचं नडेला यांनी सांगितलं.
Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी अनुदान देण्यासाठी यूनिसेफ आणि गेटइंडियाला 135 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. त्याशिवाय गुगल आणि त्यांची टीम मेडिकल सप्लायही करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच हाय रिक्स कम्युनिटीची मदत करणाऱ्या संघटनांनाही मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पिचाई यांनी शेअर केली ब्लॉग पोस्ट -
सुंदर पिचाई यांनी एक ब्लॉग पोस्ट शेअर केली आहे, ज्यात भारताला गंभीर स्थितीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांविषयी सविस्तर सांगितलं आहे. 135 कोटी रुपयांच्या फंडिंगमध्ये Google.org कडून दोन ग्रेन सामिल आहेत.
यात पहिलं अनुदान गेटइंडियासाठी आहे, जेणेकरुन संकटाग्रस्त कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन खर्चात मदत करण्यासाठी रोख रकमेची मदत केली जाऊ शकते. दुसरं अनुदान यूनिसेफसाठी जाईल, जे ऑक्सिजन आणि चाचणी उपकरणांसह त्वरित वैद्यकीय पुरवठा होण्यास मदत होईल जी या क्षणी सर्वात जास्त आवश्यक आहे.
अभियान राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अनुदान -
मोहिम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देणग्याही अनुदानामध्ये समाविष्ट केल्या आहेत. ब्लॉग पोस्ट असं म्हटलं आहे की, आतापर्यंत 900 हून अधिक Google कर्मचाऱ्यांनी हाय रिस्कवाल्या देशांना पाठिंबा देणाऱ्या संस्थांना 3.7 कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ट्विट करत सांगितलं, की भारताची सध्याची स्थिती पाहून अतिशय दु:ख होत आहे. अमेरिकी सरकार मदतीसाठी पुढे आल्याने मी त्यांचा आभारी आहे. मायक्रोसॉफ्ट या संकटकाळात मदतीसाठी संसाधनं, तंत्रज्ञानाचा वापर करत राहील. तसंच महत्त्वपूर्ण ऑक्सिजनच्या डिव्हाईस खरेदीसाठीही मदत करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Google, Microsoft, Money, Tech news, Technology