मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Cyber Crime: कोणत्याही फ्रॉडसाठी अशाप्रकारे करा तक्रार; जाणून घ्या हेल्पलाईन नंबर

Cyber Crime: कोणत्याही फ्रॉडसाठी अशाप्रकारे करा तक्रार; जाणून घ्या हेल्पलाईन नंबर

रिमोट कंट्रोल app मालवेअर अ‍ॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास, या अ‍ॅपद्वारे चुकीच्या व्यक्तीकडे फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.

रिमोट कंट्रोल app मालवेअर अ‍ॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास, या अ‍ॅपद्वारे चुकीच्या व्यक्तीकडे फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.

फ्रॉडपासून वाचण्यासाठी बँका आपल्या ग्राहकांना सतत मेसेज आणि इतर प्लॅटफॉर्मवरुन याबाबत अलर्ट करतात. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने इंटरनेट बँकिंगसह (Internet Banking) ऑनलाईन फायनान्ससंबंधी फसवणूकीबाबत तक्रार करण्यासाठी नवा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 एप्रिल: कोरोना काळात डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असताना, दुसरीकडे सायबर क्राईमच्या (Cyber Crime) ,ऑनलाईन फ्रॉडच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर क्रिमिनल्सनी (Cyber Criminals) दुसऱ्यांची कमाई साफ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सायबर क्रिमिनल्स अनेक मार्गांनी इतरांच्या अकाउंटमधून पैसे काढण्याचं काम करतात. फ्रॉडपासून वाचण्यासाठी बँका आपल्या ग्राहकांना सतत मेसेज आणि इतर प्लॅटफॉर्मवरुन याबाबत अलर्ट करतात. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने इंटरनेट बँकिंगसह (Internet Banking) ऑनलाईन फायनान्ससंबंधी फसवणूकीबाबत तक्रार करण्यासाठी नवा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

फ्रॉड होऊन 24 तासांहून अधिक वेळ झाल्यास काय कराल?

- ऑनलाईन फ्रॉड झाल्यास, पोलिसांद्वारा मॅनेज हेल्पलाईनवर कॉल करावा लागेल. फ्रॉड होऊन 24 तासांहून अधिक वेळ होऊन गेल्यास, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर एक औपचारिक तक्रार दाखल करावी लागेल. जर फ्रॉड होऊन 24 तासांहून कमी वेळ झाला असेल, तर ऑपरेटर फॉर्म भरण्यासाठी फ्रॉड झाल्याचे डिटेल्स आणि तक्रारदाराची खासगी माहिती मागितली जाईल.

(वाचा - इथे पोस्ट करा वॅक्सिनेशनचा फोटो आणि जिंका 5 हजार रुपये;वाचा भारत सरकारची खास ऑफर)

- ज्यावेळी घटनेची माहिती संबंधित वित्तीय संस्थांपर्यंत पोहचवली जाते, त्यावेळी एक तिकीट रेज केलं जातं. हे फ्रॉड ट्रान्झेक्शन तिकीट ज्या वित्तीय संस्थेतून पैसे कट झाले आहेत आणि पैसे कट होऊन ज्या वित्तीय संस्थेत गेले आहेत, दोघांच्या डॅशबोर्डवर याची माहिती दिसते.

- ज्या बँक/ वॉलेटमध्ये तिकीट देण्यात आलं आहे, त्याला फ्रॉड ट्रान्झेक्शनच्या माहितीसाठी तपास करावा लागतो. जर पैसे गेले असतील, तर हे पोर्टलमध्ये ट्रान्झेक्शनची माहिती देतं आणि दुसऱ्या वित्तीय संस्थेत जातं.

(वाचा - UIDAI ने सांगितला Aadhaar सुरक्षित ठेवण्याचा नवा पर्याय; असा लॉक करा आधार नंबर)

- जर फंड नसेल, तर त्याला टेंप्रेरी होल्डवर टाकलं जातं. फंड येणं चालूच राहतं, जोपर्यंत ते होल्डवर टाकलं जात नाही किंवा डिजीटल इकोसिस्टममधून बाहेर येत नाही.

हेल्पलाईन नंबर -

ऑनलाईन फ्रॉडसंबंधी प्रकरणांत तक्रारदार 155260 डायल करुन तक्रार दाखल करू शकतात. ज्याप्रमाणे 112 हेल्पलाईन नंबर सायबर फ्रॉड झालेल्या लोकांची मदत करतं. त्याचप्रमाणे या क्रमांकावरुनही मदत मिळवली जाऊ शकते.

First published:

Tags: Cyber crime, Internet, Online fraud, Tech news