'डेब्यूआधी रोहित खूप आळशी वाटायचा पण...', युवीने हिटमॅनबाबत केला मोठा खुलासा

'डेब्यूआधी रोहित खूप आळशी वाटायचा पण...', युवीने हिटमॅनबाबत केला मोठा खुलासा

विराट कोहलीनंतर आज क्रिकेट विश्वात रोहित शर्माचे वर्चस्व आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 एप्रिल : विराट कोहलीनंतर आज क्रिकेट विश्वात रोहित शर्माचे वर्चस्व आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. पण एक वेळ अशीही होती जेव्हा रोहितला संघात जाग मिळत नव्हती. भारतीय संघातील आपले स्थान पक्के करण्यासाठी रोहितला बराच कालावधी लागला.

भारतीय सलामीवीर रोहित शर्माने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं अनेक शॉट्समुळे सर्वांना प्रभावित केले. मात्र मर्यादित षटकातील फॉर्मेटसाठी संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी त्याला सहा वर्षे लागली. रोहितला संघात पुन्हा जागा देण्याचे श्रेय 2013मध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीला जाते. धोनीने रोहितची प्रतिभा ओळखली. धोनीबरोबरच आणखी एक खेळाडू होता, ज्याने रोहितला सुरुवातीच्या काळापासून मदत केली. तो खेळाडू आहे युवराज सिंग.

वाचा-89 व्या वर्षी होणार तिसऱ्यांदा बाप, कोट्यवधींची संपत्ती असलेली व्यक्ती म्हणाली..

युवीने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान रोहित शर्माच्या पदापर्णाच्या आठवणी सांगितल्या. एवढेच नाही तर त्याच्या फलंदाजीमुळे युवीला रोहितकडे पाहून पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हकची आठवण यायची असेही त्याने सांगितले.

वाचा-वृद्ध महिलेला मदत करताच तिच्या डोळ्यात आलं पाणी, हरभजन सिंगने शेअर केला VIDEO

इंझमामसारखी रोहितची फलंदाजी

युवराज म्हणाला की, "रोहित शर्मा जेव्हा संघात आला तेव्हा तो एका दिग्गज खेळाडू सारखा खेळायचा. रोहित जेव्हा फलंदाजी करायचा तेव्हा मला इंझमामची आठवण यायची. गोलंदाजाला मोठे शॉट खेळण्यासाठी इंझमाम खूप वेळ घ्यायचा. रोहित शर्माही असेच शॉट खेळतो". रोहित शर्माने 2007मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून वयाच्या 19 व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केले होते, परंतु 2007 च्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने प्रथम धावा केल्या. जो भारताने जिंकला होता. या वर्षांत तो जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरला. रोहितने 224 एकदिवसीय सामन्यात 9 हजार 115 धावा केल्या असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे.

वाचा-विराटनं टीम इंडियात खेळावं अशी धोनीची इच्छा नव्हती, माजी सिलेक्टरनी केला खुलासा

First published: April 5, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या