विराटनं टीम इंडियात खेळावं अशी धोनीची इच्छा नव्हती, माजी सिलेक्टरनी केला धक्कादायक खुलासा

आम्ही विराटला खेळताना पाहिलेलं नाही त्यामुळे त्याला खेळवता येणार नाही. आपण जुन्या संघासह मैदानात उतरायचं असं तेव्हा धोनी म्हणाला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 एप्रिल : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनी धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे. सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या धोनीच्या निवृत्तीची चर्चा असली तरी त्याबद्दल नाही तर विराट कोहलीबाबत धोनीचं मत काय होतं याचा खुलासा केला आहे. त्यात म्हटलं आहे की, एक वेळ अशी होती की धोनीला वाटत नव्हतं की विराट कोहली भारतासाठी क्रिकेट खेळावा. त्यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट उघड केली.

दिलीप वेंगसरकर यांनी म्हटलं की, 2008 मध्ये जेव्हा अंडर 23 संघाच्या खेळाडूंना निवडण्यासाठी निवडसमितीचं एकमत झालं होतं. तेव्हाच भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला निवडण्यात आलं होतं. तेव्हा लंकेचा दौरा होता. प्रशिक्षक गॅरी कर्स्टन होते तर कर्णधार धोनी होता. धोनीने सांगितलं की, आम्ही विराटला खेळताना पाहिलेलं नाही त्यामुळे त्याला खेळवता येणार नाही. आपण जुन्या संघासह मैदानात उतरायचं.

धोनी आणि कर्स्टन यांनी विराटबद्दल जेव्हा त्याला खेळताना पाहिलं नसल्याचं सांगितलं तेव्हा वेंगसरकर यांनी आपण काय उत्तर दिलं ते सांगितलं. वेंगसरकर म्हणाले की, मी म्हणालो की तुम्ही पाहिलं नाहीत पण मी पाहिलं आहे आणि आपण त्याला घ्यायला हवं. मला वाटत होतं की विराट कोहलीला लंकेच्या दौऱ्यावर घेऊन जाण्यासाठी तीच योग्य वेळ आहे. मात्र धोनी आणि कर्स्टन या मतावर सहमत नव्हते.

हे वाचा : 9 वर्षांपूर्वी धोनीने ऐतिहासिक षटकार लगावला तेव्हा तुम्ही काय करत होता?

विराटला खेळवण्यासाठी तयार नसलेल्या धोनीने एस बद्रीनाथचं समर्थन केलं होतं. त्याने घरेलू क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ केला होता. बसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष एन. श्रीनिवासन हेसुद्धा विराटला संघात घेण्याच्या निर्णयावर खूश नव्हते. कारण त्यांचेही मत एस बद्रीनाथला संधी द्यावी असं असल्याचं दिलीप वेंगसरकर यांनी सांगितलं.

हे वाचा : 5 दिग्गज खेळाडूंच्या करिअरवर Coronavirus चे संकट, घ्यावी लागणार निवृत्ती!

एस बद्रीनाथबद्दल सांगताना दिलीप वेंगसरकर म्हणाले की, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नईकडून खेळत होता. या संघाचे सहमालक श्रीनिवासन होते. त्यामुळे आमच्यावर दबाव होता. 2008 मध्ये वेंगसरकर यांच्या जागी के श्रीकांत संघाचे नवे निवडकर्ता झाले.

हे वाचा : 'विराट आणि धोनीने साथ दिली असती तर...', युवराज सिंगने व्यक्त केली नाराजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2020 04:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading