89 व्या वर्षी होणार तिसऱ्यांदा बाप, कोट्यवधींची संपत्ती असलेली व्यक्ती म्हणाली...

89 व्या वर्षी होणार तिसऱ्यांदा बाप, कोट्यवधींची संपत्ती असलेली व्यक्ती म्हणाली...

जगाला वेगाचा नवीन अर्थ सांगणारे आणि F1च्या नव्या युगाची सुरुवात करणारे बर्नी एकलेस्टोन वयाच्या 89 व्या वर्षी पुन्हा एकदा वडील होणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 एप्रिल : जगाला वेगाचा नवीन अर्थ सांगणारे आणि F1च्या नव्या युगाची सुरुवात करणारे बर्नी एकलेस्टोन वयाच्या 89 व्या वर्षी पुन्हा एकदा वडील होणार आहेत. एकलेस्टोन तिसऱ्यांदा वडील होणार आहे. बर्नी यांच्या पत्नी फॅबियाना फ्लोसी या वर्षी जुलैमध्ये एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. फॅबियाना ह्या बर्नी यांच्यापेक्षा तब्बल 45 वर्षांनी लहान आहेत. बर्नी यांनी 2013 साली फॅबियानासोबत लग्न केलं होतं.

कोट्यवधींचे मालक आहेत बर्नी

बर्नी हे 1978 ते 2017 पर्यंत F1 चे बॉस होते. एक्लेस्टोन एकेकाळी कार विक्रेता म्हणून काम करायचे आणि पाहता पाहता F1 मध्ये सामील झाले. आणि कोटय़वधी रुपयांच्या व्यवसायात बनला.बर्नी स्वतः एफ-वन रेसर होते. 1972 साली त्यांनी स्वत:ची एक चांगली टीम तयार केली. त्यासोबत अनेक टीव्ही कॉन्ट्रॅक्स साईन केले. खेळाच्या दुनियेत सगळ्यात बलवान व्यक्ती म्हणून त्यांचं नाव समोर येतं. ब्रिटनमधील चौथ्या स्थानावरचे श्रीमंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कोट्यवधींची संपत्ती त्यांनी कमवली आहे.

हे वाचा-पनवेलकरांना दिलासादायक बातमी, 'त्या' 10 जणांना कोरोनाची लागण नाही!

या वर्षीत वडील होणं ही सामान्य गोष्ट...

जेव्हा त्यांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यात काय विचित्र आहे. 29 किंवा 89 मधील फरक दिसत नाही. माझी पत्नी खूप आनंदी आहे. ही फार सामान्य गोष्ट आहे. मला साथ देणारं कुणीतरी मिळालं आणि आता आमच्यासोबत आणखी एक मेंबर फॅमेलिमध्ये येणार आहे. त्यासाठी मी खूप आनंदी आणि उत्सुक आहे. बर्नीला तमारा आणि पेट्रा या दोन मुली आहेत. दोन्ही मुली एफ-वनचीही आवड आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये नागपुरात हातभट्टीवर फिल्मी स्टाईल रेड, लाखोंचा माल केला नष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2020 04:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading