पल्लेकेल, 05 मार्च : वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात झालेला पहिला टी-20 सामना रोमांचक झाला. वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 25 धावांनी मात दिली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 196 धावा केल्या. तर, या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला केवळ 171 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला जलद गोलंदाज ओशाने थॉमस (Oshane Thomas). ओशानाने 28 धावा देत 5 विकेट घेतल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी ओशाने थॉमसचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात ओशाने थोडक्यात वाचला होता. मात्र या अपघातातून वाचत ओशाने थॉमसने दणक्यात कमबॅक केला. त्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला. वाचा- आफ्रिकेविरुद्ध मालिकेत होणार बदल; विराट, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू होणार कॅप्टन ओशानेचा कहर ओशने थॉमसने पहिल्याच षटकात श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना बाद केले. थॉमसने तिसर्या चेंडूवर अविष्का फर्नांडोला 7 धावांवर बाद केले. यानंतर, पुढच्याच चेंडूवर त्याने शहान जयसूर्याची विकेट घेतली. थॉमस यांना हॅटट्रिक घेण्याची संधी होती पण कुसल मेंडिसने हे होऊ दिले नाही. मात्र, ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कुसल मेंडिसला बाद करून थॉमसने श्रीलंकेला तीन गडी बाद केले. आपली दुसरी षटके घेऊन आलेल्या थॉमसने शेवटच्या चेंडूवर अँजेलो मॅथ्यूजला बाद करून श्रीलंका संघाला मोठा झटका दिला. यानंतर ओशने थॉमसने पॉवरप्लेच्या शेवटच्या बॉलवर दासुन शनाकाला बोल्ड केले आणि आपली पाच बळी पूर्ण केली. थॉमसने टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत प्रथमच पाच विकेट घेतल्या आहेत. वाचा- 12 वर्षानंतर बदलणार RCBचं नशीब! ‘हे’ 3 खेळाडू विराटला करणार IPL चॅम्पियन विजयात सिमन्स, पोलार्ड आणि रसेल यांचे योगदान या सामन्यात ओशानेबरोबरच सिमन्स, पोलार्ड आणि रसेल यांनी चांगली कामगिरी केली. सिमन्सने सलामीवीर म्हणून 51 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. कर्णधार पोलार्डनेही 15 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या, रसेलनेही 14 चेंडूत 35 धावांचे तुफानी खेळी केली. ब्रँडन किंगनेही 33 धावांचे योगदान दिले. वाचा- 18 सिक्स आणि 189 धावा! IPLआधी गोलंदाजांवर तुटून पडला हार्दिक पांड्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.