मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

आफ्रिकेविरुद्ध मालिकेत होणार मोठा बदल; विराट, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू होणार कॅप्टन

आफ्रिकेविरुद्ध मालिकेत होणार मोठा बदल; विराट, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू होणार कॅप्टन

  • Published by:  Priyanka Gawde

मुंबई, 05 मार्च : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तब्बल 40 दिवस न्यूझीलंड दौऱ्यावर होता. यात भारतानं टी-20 मालिका जिंकली मात्र एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंड दौऱ्यात विराटला लौकिकेला साजेशी कामगिरी करता आली नाही. आता भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी आज भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.

भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 12 मार्चपासून सुरुवात होईल. दरम्यान या मालिकेत भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात. विराट कोहली गेले काही महिने सतत क्रिकेट खेळत आहे. तर, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दौऱ्यानंतर लगेचच आयपीएलचा सुरुवात होईल. त्यामुळं या मालिकेत विराटला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळं संघाचे कर्णधारपद कोणाकडे देणार हा प्रश्न सध्या नव्या निवड समितीपुढे आहे.

वाचा-BCCI देणार कोहलीला दणका! आफ्रिकेविरुद्ध ‘या’ खेळाडूला करणार कर्णधार?

विराटला देणार विश्रांती तर रोहित अनफिट

मिडीया रिपोर्टनुसार, रोहित शर्मा अजूनही फिट झालेला नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत रोहितला दुखापत झाली होती. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून त्यानं माघार घेतली. काही दिवसांपूर्वी रोहितनं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सरावही केला. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

वाचा-18 सिक्स आणि 189 धावा! IPLआधी गोलंदाजांवर तुटून पडला हार्दिक पांड्या

केएल राहुलकडे असणार संघाचे कर्णधारपद?

विराट आणि रोहित शर्मा दोघांना आफ्रिकेविरुद्ध मालिकेत विश्रांती दिल्यास, भारताला नवा कर्णधार मिळू शकतो. काही मिडीया रिपोर्टनुसार केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत राहुलने चांगली कामगिरी केली होती. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज होता. त्यामुळं राहुलकडे कर्णधारपद जाऊ शकते.

वाचा-गांगुलीचा हुकुमी एक्का आता झाला निवड समितीचा प्रमुख, BCCIने केली घोषणा

शिखर-हार्दिक करणार कमबॅक

भारताचा हुकुमी एक्का हार्दिक पांड्याने सप्टेंबर 2019मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो गेले कित्येक महिने मैदानाबाहेर होता. सध्या पांड्या फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं त्याला न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळू शकते. नुकत्याच डीव्हाय पाटील टी-20 लीगमध्ये हार्दिक पांड्याने 39 चेंडूत 105 धावांची शानदार शतकी खेळी केली होती. तर, शानदार गोलंदाजी करत 5 विकेटही घेतल्या होत्या. तर, शिखर धवनही फिट झाल्यामुळं त्यालाही संघाता जागा मिळू शकते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा संभाव्य संघ- शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, लोकेश राहुल (कर्णधार), ऋषभ पंत, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर.

First published:

Tags: Cricket, India vs south africa, Kl rahul, Rohit sharma, Virat kohli