Home /News /sport /

Womens T20 World Cup Semi Final Eng vs Ind : पावसामुळे सामना रद्द, भारतीय महिला संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये

Womens T20 World Cup Semi Final Eng vs Ind : पावसामुळे सामना रद्द, भारतीय महिला संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये

हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.

    सिडनी, 05 मार्च : हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यापासून आता केवळ एक पाऊलं दूर आहे. आज भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल सामना होणार होता. मात्र पावसामुळं हा सामना रद्द झाला. त्यामुळ आयसीसीच्या नियमामुळे भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द झाला. भारतीय महिला संघाने गेल्या सात वर्षात एकदाही टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला नाही. त्यामुळं हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा फायनलमध्ये उतरण्यात टीम इंडिया सज्ज आहे. भारताचा फायनलमध्ये सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ग्रुप स्टेजमधली कामगिरी भारतासाठी फायद्याची ठरली. भारताने ग्रुप स्टेजमध्ये चारही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी कप दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला 18 धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडविरुद्धची लढत रोमहर्षक झाली होती. यामध्ये भारताने 3 धावांनी निसटता विजय मिळवला होता. शेवटच्या सामन्यात लंकेला 7 गडी राखून धूळ चारली. त्यामुळं गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर होता, त्यामुळं भारताने थेट फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनंसुद्धा एकही सामना गमावला नाही. त्यामुळे त्यांनाही सेमीफायनलमध्ये सामना रद्द झाल्यास फायदा होईल. भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, स्मृती मानधना, शिखा पांडे, पूनम यादव, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, तानिया भाटिया, राधा यादव, अरुंधती रेड्डी, हरलीन देवल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, पूजा वस्त्रकार. इंग्लंड : हीदर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमाँट, कॅथरिन ब्रंट, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, सोफी एस्सेलस्टोन, जॉर्जिया एल्विस, सारा ग्लेन, अ‍ॅमी जोन्स, नताली शिव्हर, अ‍ॅन्या श्रबसूल, मॅडी व्हिलियर्स, फ्रॅन विल्सन, लॉरेन विनफिल्ड, डॅनी याट.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: T20 world cup, Team india

    पुढील बातम्या