जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Nz vs Pak: चौथ्याच बॉलवर न्यूझीलंडनं गमावली होती मॅच... 'हा' खेळाडू ठरला किवींसाठी व्हिलन

Nz vs Pak: चौथ्याच बॉलवर न्यूझीलंडनं गमावली होती मॅच... 'हा' खेळाडू ठरला किवींसाठी व्हिलन

न्यूझीलंडचं आव्हान संपुष्टात

न्यूझीलंडचं आव्हान संपुष्टात

Nz vs Pak: गेल्या वर्ल्ड कपमध्ये उपविजेती ठरलेली न्यूझीलंड यंदा मात्र सेमी फायनलमधूनच बाहेर पडली. सेमी फायनलच्या या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर आणि विकेट किपर डेवॉन कॉनवे व्हिलन ठरला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सिडनी, 09 नोव्हेंबर: पाकिस्ताननं सिडनीचं मैदान गाजवून मेलबर्नमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठीचं तिकीट कन्फर्म केलं. खरं तर आयसीसीच्या बाद फेरीत न्यूझीलंडला पाकिस्तानविरुद्धचा जुना इतिहास पुसण्याची संधी होती. पण विल्यमसनच्या संघानं ती संधी गमावली आणि 1992, 1999 आणि 2011 सालच्या वन डे वर्ल्ड कपनंतर पुन्हा एकदा बाद फेरीत न्यूझीलंड पाकिस्तानकडून पराभूत झाली. पण सिडनीतल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडनं पाकिस्तानच्या डावात पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठी चूक केली आणि तीच चूक किवी संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरली. त्यात न्यूझीलंडचा हा खेळाडू त्यांच्यासाठी व्हिलन ठरला. कॉनवे ठरला किवींसाठी व्हिलन गेल्या वर्ल्ड कपमध्ये उपविजेती ठरलेली न्यूझीलंड यंदा मात्र सेमी फायनलमधूनच बाहेर पडली. सेमी फायनलच्या या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर आणि विकेट किपर डेवॉन कॉनवे व्हिलन ठरला. 153 धावांचं आव्हान घेऊन पाकिस्तानची टीम मैदानात उतरली. पण पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेन्ट बोल्टच्या बॉलिंगवर कॉनवेनं एक मोठी चूक केली. त्यानं चौथ्या बॉलवर बाबर आझमचा कॅच सोडला आणि तिथेच मॅचला कलाटणी मिळाली. त्यानंतर बाबरनं 53 धावांची खेळी करुन पाकिस्तानला विजयाकडे नेलं. जर कॉनवेनं ते कॅच पकडलं असतं तर मॅचचा रिझल्ट कदाचित वेगळा लागला असता.

जाहिरात

रन आऊट -  Nz vs Pak: सिडनीत किवींचा धुव्वा, आता मेलबर्नमध्ये खरंच होणार भारत-पाकिस्तान फायनल? आळशीपणामुळे रन आऊट दरम्यान बॅटिंग करतानाही कॉनवेनं एक चूक केली होती. सेट झालेला असताना तो 21 धावांवर बाद झाला. पण हा घेताना तो खूपच आरामात धावला आणि शादाबच्या थ्रोवर तो रन आऊट झाला. विकेट किपिंग करताना त्यानं बाईजच्या रुपात 4 धावाही दिल्या. त्यामुळे एका अर्थानं कॉनवेची खराब कामगिरी न्यूझीलंडच्या पराभवास कारणीभूत ठरली.

News18

भारत-इंग्लंड दुसरी सेमी फायनल दरम्यान उद्या भारत आणि इंग्लंड संघात दुसरी सेमी फायनल खेळवण्यात येणार आहे. जर ही मॅच भारतानं जिंकली तर मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. 2007 साली भारत आणि पाकिस्तान संघात टी20 वर्ल्ड कपची फायनल रंगली होती. त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी तशी संधी निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात