सिडनी, 09 नोव्हेंबर: आयसीसी स्पर्धेच्या मैदानात पाकिस्ताननं न्यूझीलंडवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं. बाद फेरीत पाकिस्तानला हरवण्यात आज न्यूझीलंड पुन्हा अपयशी ठरली. सिडनीच्या मैदानात सेमी फायनलमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवून तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची फायनल गाठली. याआधी 2007 आणि 2009 मध्ये पाकिस्तानी संघ टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता.
WHAT A WIN, PAKISTAN! 🤯
— ICC (@ICC) November 9, 2022
Pakistan have reached their third Men's #T20WorldCup final 👏#NZvPAK pic.twitter.com/dumaIcWVeZ
बाबर-रिझवान फॉर्मात या सामन्यात डॅरिल मिचेल (53) आणि केन विल्यमसनच्या (46) खेळीमुळे न्यूझीलंडनं पाकिस्तानसमोर 152 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या तुफानी खेळीमुळे पाकिस्ताननं हे आव्हान शेवटच्या ओव्हरमध्ये पार केलं. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आणि रिझवान ही भरवशाची जोडी फ्लॉप ठरली होती. पण सेमी फायनलच्या निर्णायक मुकाबल्यात हे दोघंही पुन्हा फॉर्मात आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 भागीदारी साकारत पाकिस्तानचा विजय सोपा केला. बाबरनं 53 तर रिझवाननं 57 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या हॅरिसनं 30 धावांचं मोलाचं योगदान दिलं. हेही वाचा - Ind vs Eng: सेमी फायलमध्ये रोहित शर्मा खेळणार की नाही? प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली ‘ही’ मोठी अपडेट ‘ते’ कॅच महागात दरम्यान पाकिस्तानच्या इनिंगमध्ये चौथ्याच बॉलवर डेवॉन कॉनवेनं बाबर आझमचा सोपा कॅच सोडला. तोच कॅच न्यूझीलंडला महागात पडला. त्यानंतर बाबरनं अर्धशतक ठोकलं आणि पाकिस्तानला फायनलचं तिकीट कन्फर्म करुन दिलं.
भारत पाकिस्तान फायनल? दरम्यान मेलबर्नमध्ये 13 नोव्हेंबरला यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला हरवून फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आता भारतानं इंग्लंडला हरवून फायनल गाठावी अशी क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. असं झालं तर मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा महामुकाबल्याची पर्वणी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. भारत आणि इंग्लंड संघातली सेमी फायनलची लढत गुरुवारी अॅडलेडमध्ये होणार आहे.

)







