मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: पराभवानंतर मैदानातच रोहित रडला, पण त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये पाहा काय काय घडलं?

T20 World Cup: पराभवानंतर मैदानातच रोहित रडला, पण त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये पाहा काय काय घडलं?

निराश रोहित शर्मा

निराश रोहित शर्मा

T20 World Cup: सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये जमले. तेव्हा राहुल द्रविड यांनी खेळाडूंशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी रोहितला बोलायला सांगितलं. पण...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरच राहिलं. अॅडलेडच्या मैदानात इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट जाणवत होती. त्यानंतर मैदानातच डगआऊटमध्ये तो रडताना दिसला. सेमी फायनलमधला हा पराभव जिव्हारी लागल्यानं रोहितच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यावेळी कोच राहुल द्रविडसह सहकारी खेळाडूंनी त्याला शांत केलं.

ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं?

सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये जमले. तेव्हा राहुल द्रविड यांनी खेळाडूंशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी रोहितला बोलायला सांगितलं. पण रोहित इतका भावूक झाला होता की त्याला सुरुवातीला काहीच बोलता आलं नाही. सहकारी खेळाडूंनी धीर दिला त्यानंतर रोहित बोलला. त्यानं खेळाडूंचे तसेच सपोर्ट स्टाफचे आभार मानले. टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया चांगली खेळली असंही तो म्हणाला. टीममधील काही खेळाडूंनी दिलेल्या माहितीनुसार  याआधीही रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पराभव झाला होता. पण त्यांनी रोहितला इतका दु:खी आणि भावूक झालेला कधीच पाहिला नाही.

हेही वाचा - T20 World Cup: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल, रोहितनंतर 'हा' होणार टी20चा नवा कॅप्टन?

निघण्यापूर्वी टीम मिटिंग

त्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू घरी परतण्यासाठी पॅक अप करत होते तेव्हा रात्री उशिरा टीमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज आला. त्यात सगळ्या खेळाडूंना हॉटेलमध्ये छोट्या मिटिंगसाठी एकत्र येण्याचा मेसेज देण्यात आला. या मिटिंगमध्ये सगळ्या खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली. त्याचबरोबर नेटमध्ये गोलंदाजी केल्याबद्दल संघव्यवस्थापनानं राखीव खेळाडू मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांचे आभार मानले.

रोहितसाठी शेवटचा वर्ल्ड कप?

इंग्लंडकडून झालेला पराभव जिव्हारी लागण्याचं कारण म्हणजे भारतीय संघ सेमी फायनलआधी केवळ एकच सामना हरला होता आणि गटात अव्वल स्थानावर होता. पण एका पराभवानं सगळी मेहनत वाया गेली. रोहित भावूक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचा हा शेवटचा टी20 वर्ल्ड कप ठरु शकतो. कारण तो 35 वर्षांचा आहे आणि 2024 मध्ये 37 वर्षांचा होईल. अशा स्थितीत तो पुढचा टी20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता कमी आहे.

First published:

Tags: Rohit sharma, Sports, T20 world cup 2022