मुंबई, 21 जानेवारी : आयपीएल 2023 पूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा फटका बसला आहे. विराट कोहली कर्णधार असलेल्या RCB संघाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक झाले असून हॅकर्सनी या अकाऊंटचा ताबा घेतला आहे. अकाऊंट हॅक करून हॅकर्सनी त्यावर काही ट्विट देखील केले असून काही वेबसाईटच्या लिंक्स शेअर केल्या आहेत. हॅक झालेल्या अकाउंटवरून चित्रविचित्र पोस्ट शेअर केल्यानंतर आरसीबीने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.
The official Twitter account of Royal Challengers Bangalore (RCB) has been hacked.#INDvsNZ #INDvNZ pic.twitter.com/7Ix4763ljv
— DRINK CRICKET (@Drink_Cricket) January 21, 2023
शनिवारी 21 जानेवारी रोजी आयपीएलचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले. त्यानंतर लगेचच हॅकर्सनी हे अकाऊंट ऍक्सेस करायला सुरुवात केली. हॅकर्सनी ट्विटर हँडलचे नाव बदलून 'Bored Ape Yacht Club' असे नाव ठेवले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वेबसाइटची अधिकृत लिंक जी ट्विटर हँडलवर देण्यात आली होती ती देखील इतर काही वेबसाइटवर बदलण्यात आली आहे.
हे ही वाचा : IND VS NZ : कॅप्टन रोहित गोंधळला! टॉस जिंकल्यानंतर काय करायचे हेच विसरला, पहा व्हिडीओ
अकाऊंट हॅक झाल्यानंतर RCB संघाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले, "21 जानेवारी 2023 रोजी पहाटे 4 च्या सुमारास RCB च्या ट्विटर हँडल हॅक झाले आहे. आणि त्यावरचा अॅक्सेस आम्ही गमावला आहे".
RCB twitter account hacked Here is the official statement from them #RoyalChallengersBangalore pic.twitter.com/KYTQRuV0yy
— Virat Kohli Fans (@Viratians_TN) January 21, 2023
"Twitter ने शिफारस केलेले सर्व सुरक्षा उपाय करूनही ही दुर्दैवी घटना घडली असून ती आमच्या नियंत्रणाबाहेरची आहे. आज आमच्या ट्विटर हँडलवरून झालेले कोणत्याही ट्विट आणि रिट्विट्सचे आम्ही समर्थन करत नाही. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. याचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी आम्ही Twitter सपोर्ट टीमसोबत काम करत आहोत. आम्ही लवकरच परत येऊ."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, RCB, Team india, Twitter, Virat kohli