ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा खेळाडू डॅन ख्रिश्चन याने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात असणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूने अचानक क्रिकेट विश्वातून एक्सिट घेतल्यामुळे सर्वांनाच काहीसा धक्का बसला.
डॅन ख्रिश्चन हा जगभरात त्याच्या अष्टपैलू खेळामुळे फार लोकप्रिय आहे. डॅन ख्रिश्चन हा आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या RCB संघाकडून खेळतो. RCB साठी हा खेळाडू अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याने RCB ला हातून गेलेली मॅच जिंकवून दिली होती. त्यामुळे हा खेळाडू अधिक चर्चेत आला होता.
39 वर्षीय डॅननं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीची माहिती क्रिकेटप्रेमींना दिली. त्यानं अतिशय सकारात्मक वळणावर आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.
डॅनने त्याच्या कारकिर्दीत जगभरातील टी20 क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने 405 टी 20 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 5809 धावा केल्या आणि 280 विकेट्सही मिळवले.
डॅनची आयपीएल कारकीर्द अतिशय लोकप्रिय ठरली . आयपीएलमध्ये त्याच्या नावे 49 सामन्यांमध्ये 460 धावांची नोंद आहे, तर त्यानं या स्पर्धेत 38 विकेट्सही मिळवले होते.
डॅनने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेकांनीच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.