जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'आत्तापर्यंत काहीच करु शकला नाही' KKR च्या फ्लॉप प्लेअरला गावस्करांनी फटकारले

'आत्तापर्यंत काहीच करु शकला नाही' KKR च्या फ्लॉप प्लेअरला गावस्करांनी फटकारले

gavaskar

gavaskar

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा संघ यंदाच्या मोसमातही विजयासाठी झगडताना दिसत आहे. सोमवारी पराभवाचे पाच धक्के खाल्यानंतर राजस्थानविरुद्ध विजय मिळवला. अशातच खडतर वाटेवर चालणाऱ्या केकेआरचा आतापर्यंत एकही चांगली सलामी जोडी सापडलेली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा संघ यंदाच्या मोसमातही विजयासाठी झगडताना दिसत आहे. सोमवारी पराभवाचे पाच धक्के खाल्यानंतर राजस्थानविरुद्ध विजय मिळवला. अशातच खडतर वाटेवर चालणाऱ्या केकेआरचा आतापर्यंत एकही चांगली सलामी जोडी सापडलेली नाही आणि हे देखील त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले आहे. संघाने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये पाचवेळा सलामीची जोडी बदलली आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि संघ व्यवस्थापनाने व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्ज, आरोन फिंच आणि बाबा इंद्रजीत सलामीवीर म्हणून प्रयत्न केले, परंतु फिंच वगळता कोणीही आतापर्यंत फार काही करू शकले नाही. राजस्थानविरुद्ध फिंच आणि इंद्रजीत दोघेही अपयशी ठरले होते. या सामन्यात युवा व्यंकटेश अय्यरला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी अनुकुल रॉयला संधी देण्यात आली. ना बॅटिग ना बॉलिंग तरीही चर्चेत, आंद्रे रसेलचा तो VIDEO व्हायरल गतवर्षी व्यंकटेश अय्यरने धमाकेदार खेळी करत कोलकाताला फायनलमध्ये नेले होते, पण या मोसमात त्याला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. चेंडू त्याच्या बॅटकडे नीट येत नाही आणि तो चेंडूला योग्य वेळ देऊ शकत नाही. त्यामुळेच केकेआरला कठोर निर्णय घ्यावा लागला. आता माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी कोलकात्याच्या या निर्णयाला सार्थ ठरवले आहे. गावस्कर म्हणाले की, अष्टपैलू व्यंकटेश ‘सेकंड सीझन सिंड्रोम’ने त्रस्त आहे. त्याच्या या मोसमात नऊ सामन्यांत 132 धावा आहेत, तर व्यंकटेशने गेल्या मोसमात 10 सामन्यांत 370 धावा केल्या होत्या. याशिवाय व्यंकटेशला या मोसमात गोलंदाजीमध्ये फारसे काही करता आलेले नाही आणि त्याने केवळ तीन षटके टाकली असून एकही विकेट घेतलेली नाही. कोलकाताचा संघ जिंकू शकला नाही, त्यामुळे त्यांना काही बदल करावे लागले. व्यंकटेशने या मोसमात नऊ-दहा सामने खेळले असून आतापर्यंत त्याने काही विशेष कामगिरी केली नाही. व्यंकटेशची बॅट किंवा बॉलमध्ये कामगिरी काही खास नाही. यामुळेच कर्णधार श्रेयसने अनुकुल रॉयला मैदानात उतरवले. अनुकुल हा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. कोलकाता संघ व्यवस्थापनाने वेंकटेश आणि वरुण चक्रवर्ती, जे गेल्या काही मोसमांचे नायक होते, त्यांना सोमवारी प्लेइंग-11 मध्ये संधी दिली नाही. श्रेयसने सांगितले होते की तो सर्व खेळाडूंना संधी देत ​​आहे, पण त्याला योग्य संयोजन शोधण्याचीही गरज आहे. कोलकाताचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. राजस्थानविरुद्धच्या विजयाने संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात