जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ना बॅटिग ना बॉलिंग तरीही चर्चेत, आंद्रे रसेलचा तो VIDEO व्हायरल

ना बॅटिग ना बॉलिंग तरीही चर्चेत, आंद्रे रसेलचा तो VIDEO व्हायरल

ना बॅटिग ना बॉलिंग तरीही चर्चेत, आंद्रे रसेलचा तो VIDEO व्हायरल

कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) आयपीएल 2022(IPL 2022) मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. मात्र, सोमवारी झालेल्या राजस्थानविरुद्ध सामन्यात ना त्याने बॅटिंग केली ना त्याने बॉलिंग. तरीही तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे: कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) आयपीएल 2022(IPL 2022) मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. मात्र, सोमवारी झालेल्या राजस्थानविरुद्ध सामन्यात ना त्याने बॅटिंग केली ना त्याने बॉलिंग. तरीही तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मैदानातील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यातील हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पार पडला. केकेआरने 7 विकेट्स राखून राजस्थानला धूळ चारली आणि हंगामातील त्यांचा चौथा विजय मिळवला. झालेल्या या सामन्यादरम्यान, केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसेल (Aandre Russell) याला सोमवारी फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळाली नसली, तर त्याने मैदानात डान्स करून चाहत्यांचे मनोरंजन केले.

जाहिरात

स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षणांमध्ये माहोल बनवण्यासाठी मोठ्या आवाजात गाणी लावली जात असतात. रसेल सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि तितक्यात ‘आता माझी सटकली’ हे गाणे लागले. रसेलच्या हातात त्यावेळी टॉवेल होता आणि तो या टॉवेलसह डान्स स्टेप्स करू लागला. रसलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरला आहे

रसलचा हा डान्स पाहून हर्षा भोगले यांनी ताबतोब प्रतिक्रिया दिली. अरे, हे वेस्ट इंडिजचे खेळाडू, षटकार ठोकत किंवा विकेट्स घेत नसले, तरी ते त्यांच्या डान्सने सामन्याचा आनंद घेतात. असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात