नवी दिल्ली, 19 जुलै : टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरू होण्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या मालिकेपूर्वी एका यष्टीरक्षक आणि एका फलंदाजाने निवृत्ती जाहीर केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दमदार कामगिरी केली होती. दोघेही त्यांच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जात होते. या दिग्गज फलंदाजांनी घेतली निवृत्ती - वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज लेंडल सिमन्सने भारत आणि वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वेस्ट इंडिजसाठी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सिमन्सची कारकीर्द बहारदार होती. त्याच्या निवृत्तीची बातमी त्रिनबागो नाईट रायडर्सने आपल्या ट्विटर हँडलवरून दिली. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
Congratulations on a terrific international career, @54simmo 👏👏
— Trinbago Knight Riders (@TKRiders) July 18, 2022
He retires from @windiescricket with 3763 runs across all three formats with an ODI highest score of 122 vs Bangladesh. Happy second innings, Simmo ❤️✨ #LendlSimmons #Cricket #Retirement pic.twitter.com/al4FUwY1WY
वन-डे आणि टी-20 जलवा - 25 जून 1985 रोजी त्रिनिदाद येथे जन्मलेल्या लेंडल सिमन्सने वेस्ट इंडिजसाठी सर्व फॉरमॅटमध्ये 3763 धावा केल्या. त्याने वेस्ट इंडिजसाठी 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.58 च्या सरासरीने 1958 धावा केल्या. एकदिवसीय कारकिर्दीत त्याला केवळ दोनच शतके करता आली. त्याने 2015 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. सिमन्सने 68 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 1527 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 अर्धशतके झळकावली आहेत. हे वाचा - आधी विराटला पाठिंबा, आता त्यालाच दिला धक्का, बाबरचा कोहलीला धोबीपछाड! आयपीएलमधला प्रवास - लेंडल सिमन्स हा इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे. त्याने आयपीएलच्या चार हंगामात भाग घेतला. या आयपीएलमध्ये त्याने 29 सामने खेळले असून 1079 धावा केल्या आहेत. सिमन्सने आयपीएलमध्ये एक शतक आणि 11 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 2015 मध्ये झाली, त्याने या हंगामात 13 सामन्यांमध्ये 540 धावा केल्या. तो मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. त्याची कसोटी कारकीर्द फारशी चांगली राहिली नव्हती. दोन वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत तो फक्त 8 सामने खेळला. यादरम्यान सिमन्सने 17.38 च्या सरासरीने 278 धावा केल्या. हे वाचा - IND vs ENG : सिराजच्या बाऊन्सरने बटलर गरगरला! दोन वेळा बदललं हेल्मेट या विकेटकिपरनेही निवृत्ती घेतली - लेंडल सिमन्सशिवाय वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार दिनेश रामदिननेही निवृत्ती जाहीर केली आहे. रामदिनने डिसेंबर 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. रामनादिनच्या नावावर 4 कसोटी, 139 एकदिवसीय आणि 71 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह 5734 धावा आहेत. रामदिन 2012 आणि 2016 च्या टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या विजेत्या संघाचाही भाग होता. त्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली.