मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : सिराजच्या बाऊन्सरने बटलर गरगरला! दोन वेळा बदललं हेल्मेट

IND vs ENG : सिराजच्या बाऊन्सरने बटलर गरगरला! दोन वेळा बदललं हेल्मेट

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या वनडे सीरिजचा तिसरा सामना (India vs England 3rd ODI) मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये होत आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) जॉस बटलरच्या (Jos Buttler) हेल्मेटवर दोन बाऊन्सर मारले.

  • Published by:  Shreyas

मॅनचेस्टर, 17 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या वनडे सीरिजचा तिसरा सामना (India vs England 3rd ODI) मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये होत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात 6 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.

मोहम्मद सिराज पहिली मॅच खेळत असला तरी त्याने इंग्लंडच्या खेळाडूंना त्रास दिला. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर (Jos Buttler) याला दोनदा फिजियोची मदत घ्यावी लागली. कर्णधार रोहित शर्माने सिराजला 19व्या ओव्हरमध्ये दुसरा स्पेल दिला. ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलला सिराजने टाकलेला बाऊन्सर बटलरच्या हेल्मेटला लागला, यानंतर खेळ थांबवण्यात आला. इंग्लंडचा फिजियो मैदानात आला आणि त्याने बटलरला तपासलं. फिजियो संतुष्ट झाल्यानंतर खेळाला पुन्हा सुरूवात झाली.

बटलर क्रीजवर पुन्हा सेट होत नाही तोच सिराजने पुन्हा एक बाऊन्सर टाकला. यावेळीही बॉल बटरलच्या हेल्मेटला लागून बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने गेला, त्यामुळे पुन्हा एकदा फिजियो मैदानात आला. फिजियोने तपास केल्यानंतर बटलरला हेल्मेट बदलावं लागलं.

बटलरला बाऊन्सर टाकण्याआधी मॅचच्या सुरूवातीलाच सिराजने इंग्लंडला दोन धक्के दिले. फॉर्ममध्ये असलेला जॉनी बेयरस्टो आणि जो रूट यांना सिराजने शून्य रनवर पॅव्हेलिनयमध्ये पाठवलं. या सामन्यात इंग्लंडचा 259 रनवर ऑल आऊट झाला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहलला 3 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजला 2 आणि रवींद्र जडेजाला 1 विकेट घेण्यात यश आलं.

3 वनडे मॅचची ही वनडे सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 10 विकेटने तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 100 रननी विजय झाला, त्यामुळे आज विजय मिळवणारी टीम सीरिजवरही कब्जा करेल.

First published:

Tags: India vs england