मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

आधी विराटला पाठिंबा, आता त्यालाच दिला धक्का, बाबरचा कोहलीला धोबीपछाड!

आधी विराटला पाठिंबा, आता त्यालाच दिला धक्का, बाबरचा कोहलीला धोबीपछाड!

मागच्या काही काळापासून क्रिकेटच्या मैदानात संघर्ष करणाऱ्या विराट कोहलीला (Virat Kohli) पाठिंबा देणारं ट्वीट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) केलं होतं. याच बाबर आझमने आता विराट कोहलीला धक्का दिला आहे.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 17 जुलै : मागच्या काही काळापासून क्रिकेटच्या मैदानात संघर्ष करणाऱ्या विराट कोहलीला (Virat Kohli) पाठिंबा देणारं ट्वीट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) केलं होतं. याच बाबर आझमने आता विराट कोहलीला धक्का दिला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (Sri Lanka vs Pakistan 1st Test) बाबरने विराटला मागे टाकत नवा विक्रम केला आहे. बाबर आझम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 10 हजार रन (Fastest 10 Thousand Run) करणारा आशियाई क्रिकेटपटू ठरला आहे. बाबरच्या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने हा विक्रम 232 इनिंगमध्ये केला होता. बाबरला 10 हजार रन करण्यासाठी 228 इनिंग लागल्या.

जागतिक क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 10 हजार रन पूर्ण करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचे महान खेळाडू विव्हियन रिचर्ड्स (Viv Richards) यांच्या नावावर आहे. रिचर्ड्स यांनी 206 इनिंगमध्येच 10 हजार रनचा टप्पा ओलांडला होता. रिचर्ड्सनंतर दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाने 217 इनिंगमध्ये 10 हजार रन केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद 10 हजार रन

206 – सर विव्ह रिचर्ड्स

217 – हाशीम आमला

220 – ब्रायन लारा

222 – जो रूट

228 – बाबर आझम

आशियाई खेळाडूंमध्ये सगळ्यात जलद 10 हजार रन करण्याचा विराटचा विक्रम बाबरने मोडित काढला आहे. कोहली आता पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानावर आला आहे.

जलद 10 हजार रन करणारे आशियाई खेळाडू

228 – बाबर आझम

232 – विराट कोहली

243 – सुनिल गावसकर

248 – जावेद मियांदाद

253 – सौरव गांगुली

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये बाबर आझमने शतक केलं. बाबरच्या शतकामुळे पाकिस्तान अडचणीतून बाहेर आलं. त्याने 244 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली. बाबरच्या या खेळीमुळे पाकिस्तानला 218 रनपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेने पहिल्या इनिंगमध्ये 222 रन केले होते, त्यामुळे त्यांना 4 रनची आघाडी मिळाली.

First published:

Tags: Babar azam, Virat kohli