मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics, Hockey: भारताने गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाला चारली धूळ, क्वार्टर फायनलमध्ये धडक

Tokyo Olympics, Hockey: भारताने गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाला चारली धूळ, क्वार्टर फायनलमध्ये धडक

Tokyo Olympics: भारतीय पुरुष हॉकी टीमने तिसरा विजय मिळवला आहे. भारतीय संघाने 2016 रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाच्या संघाचा 3-1 ने पराभाव केला आहे.

Tokyo Olympics: भारतीय पुरुष हॉकी टीमने तिसरा विजय मिळवला आहे. भारतीय संघाने 2016 रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाच्या संघाचा 3-1 ने पराभाव केला आहे.

Tokyo Olympics: भारतीय पुरुष हॉकी टीमने तिसरा विजय मिळवला आहे. भारतीय संघाने 2016 रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाच्या संघाचा 3-1 ने पराभाव केला आहे.

टोकयो, 29 जुलै: भारतीय पुरुष हॉकी टीमने ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) च्या क्वार्टर फायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे टीमने त्यांच्या चौथ्या सामन्यात  2016 रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाच्या संघाचा 3-1 ने पराभाव केला आहे. चार सामन्यात भारताचा हा तिसरा विजय आहे. भारतीय संघाने आतापर्यंत न्यूझीलंड, स्पेन आणि अर्जेंटिनाविरोधात विजय मिळवला आहे. केवळ ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं आहे. भारतीय संघ ग्रुप-एच्या शेवटच्या सामन्यात 30 जुलै रोजी जपानशी सामना करेल.

अर्जेंटिनाविरोधातील सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघ सावधगिरीने खेळत होते. पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी एकही गोल केला नव्हता. हाफ टाइमपर्यंत या सामन्यातील स्कोअर 0-0 असाच होता. दोन्ही संघांनी पहिल्या 30 मिनिटांत एकही पेनल्टी कॉर्नर मिळवला नव्हता. 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर वरुण कुमारने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

हे वाचा-अनंत अडचणींचा सामना करत तिनं मिळवलं यश; बॉक्सर पूजा राणीची प्रेरणादायी कहाणी

चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने केले 2 गोल

अर्जेंटिनाने चौथ्या क्वार्टरमध्ये गोल केला. 48व्या मिनिटाला मॅको स्कूथने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन  स्कोअर 1-1 असा बरोबर केला. यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळीचं प्रदर्शन केलं. 58व्या मिनिटाला भारताच्या विवेक सागरने गोल करुन भारतीय संघाला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 59व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने कॉर्नरवर गोल करत भारताला 3-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. भारताला एकूण 8 कॉर्नर मिळाले आणि दोनमध्ये भारताने गोल केले होते.

हे वाचा-'मी मेलो तर तुम्ही जबाबदारी घ्याल का?,' दिग्गज टेनिसपटूचा रेफ्रींना सवाल

भारत दुसऱ्या स्थानावर

भारताच्या या तिसऱ्या विजयानंतर भारतीय हॉकी टीम ग्रुप-ए मध्ये 9 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने सर्व चारही मॅच जिंकल्यामुळे हा संघ 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. स्पेन, अर्जेंटिना आणि न्यूझीलंड या तीनही संघांचे 4-4 सामन्यांनतर गुण 4-4 आहे. मात्र गोलच्या सरासरीआधारे स्पेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड चौथ्या तर अर्जेंटिना पाचव्या क्रमांकावर आहे. जपानने 4 सामन्यात एक गुण मिळवला आहे, या टीमने एकही सामना जिंकलेला नाही.

First published:

Tags: Olympic, Olympics 2021