टोकयो, 28 जुलै: भारतीय टेनीसपटू सूमित नागलचा (Sumit Nagal) दुसऱ्या फेरीत पराभव करणाऱ्या रशिया ऑलिम्पिक समितीचा (ROC) खेळाडू डेनियल मेदवेदेवसाठी (Daniil Medvedev) बुधवारचा दिवस त्रासदायक ठरला. गोल्ड मेडलचा दावेदार समजल्या जाणाऱ्या मेदवदेवला बुधवारी टोकयोमधील उन्हाचा चांगलाच त्रास झाला. इटलीच्या फॅबियो फोगनिनी याच्या विरुद्धच्या लढतीमध्ये मेदवेदेवनं दोनदा मेडिकल टाईम आऊट घेतला. मेदवेदेवला त्रास होत असलेलं पाहून रेफ्री कार्लोस रामोस यांनी त्याला तू पुढं मॅच खेळणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर वैतागलेल्या मेदवेदेवनं, ‘मी मॅच खेळेन, पण मी जर मेलो तर त्याची तुम्ही जबाबदारी घेणार का?’ असा उलट प्रश्न रामोस यांना विचारला. आयोजकांवर टीका दुसऱ्या मानांकित मेदवेदेवनं फेगानिनीचा 6-2, 3-6 आणि 6-2 असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र या मॅचमध्ये झालेल्या त्रासातून बरं होण्यासाठी त्याला वेळ लागेल असं मानलं जात आहे. मेदवेदेवला झालेल्या त्रासामुळे ऑलिम्पिक आयोजन समितीवर टीका होत आहे. टेनीसचे सर्व सामने संध्याकाळी घेण्यात यावे हा मेदवदेव आणि नोवाक जोकोविच या अव्वल खेळाडूंनी केलेली मागणी आयोजन समितीनं मान्य का केली नाही? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. Tokyo Olympics: दीपिका कुमारीचा अचूक ‘लक्ष्य भेद’, थरारक लढतीमध्ये विजय 10 मिनिटे थांबला होता खेळ टोकयोमध्ये सकाळी झालेल्या पावसानंतर तापमान चांगलेच वाढले होते. त्यामुळे मेदवेदेव आणि फेगानिनी यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटच्यामध्ये 10 मिनिटे कोर्ट सोडण्याची परवानगी दिली होती. वाढत्या उष्णतेमुळे हा नियम लागू करण्यात आलाा. आता क्वार्टर फायनलमध्ये मेदवेदेवची पुढील लढत स्पेनच्या पाब्लो करेनो बुस्ता बरोबर होणार आहे. त्याने जर्मनीच्या डोमॅनिक कोएफरचा 7-6, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.