मुंबई, 21 एप्रिल: आयपीएल 2022 या 15 व्या (IPL 2022) सीझनची सुरुवात चांगली झाली आहे. सर्वच संघ एकमेकांशी स्पर्धा करून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र विजय त्याच संघाकडून होत आहे, ज्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. आयपीएलच्या या हंगामात दिल्लीचा गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) जबरदस्त लयीत गोलंदाजी करत आहे. कुलदीपची ही लय कायम राहिल्यास कुलदीपची टी-20 विश्वचषकातही निवड होऊ शकते. गेल्या मोसमात कुलदीप यादवला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, यंदा या पठ्याने मैदान गाजवले आहे. चायना मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुलदीप गेल्या मोसमात केकेआरच्या (KKR)संघाचा भाग होता, नंतर तो दुखापतीमुळे बाहेर गेला होता. 27 वर्षीय कुलदीप यादव आयपीएलच्या या हंगामात आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करत आहे. कुलदीप यादवने आतापर्यंत 13 विकेट्स घेतल्या आहेत. आजच्या सामन्यातही कुलदीपने दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. आजच्या सामन्यात कुलदीप यादवने 4 षटके टाकली आणि 24 धावांत 2 बळी घेतले. यंदाच्या सीझनमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 18 धावांत 3 बळी घेतले. IPL 2022: दिल्लीच्या विजयानंतर पृथ्वी-वॉर्नरबद्दल कॅप्टन पंतचं मोठं वक्तव्य, म्हणाला… गुजरात टायटन्सविरुद्ध 32 धावांत एक विकेट घेतली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने 31 धावांत 2 बळी घेतले. केकेआरविरुद्ध त्याने 35 धावांत 4 बळी घेतले. आरसीबीविरुद्ध त्याने 46 धावांत 4 बळी घेतले. सलग पराभव आणि टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) पुनरागमन केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जचा (Delhi Capitals vs Punjab Kings) 9 विकेट्सनं मोठा पराभव केला. या विजयानंतर दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावरून 6 व्या क्रमांकावर आली आहे. पंजाबविरुद्ध झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले आणि विरोधी संघाला अवख्या 115धावांवर गुंडाळले. त्यानंतर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स जेव्हा मैदानात आला, तेव्हा त्यांनी 1 विकेट्सच्या नुकसानावर आणि 10.3 षटकातच विजय मिळवला. दिल्लीचा सलामीवीर डेविड वॉर्नरने अवघ्या 30 चेंडूत 60 धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.