मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: दिल्लीच्या विजयानंतर पृथ्वी-वॉर्नरबद्दल कॅप्टन पंतचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

IPL 2022: दिल्लीच्या विजयानंतर पृथ्वी-वॉर्नरबद्दल कॅप्टन पंतचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

दिल्लीच्या विजयानंतर कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि त्याचा सलामीचा जोडीदार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे

दिल्लीच्या विजयानंतर कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि त्याचा सलामीचा जोडीदार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे

दिल्लीच्या विजयानंतर कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि त्याचा सलामीचा जोडीदार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 21 एप्रिल : सलग पराभव आणि टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) पुनरागमन केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जचा (Delhi Capitals vs Punjab Kings) 9 विकेट्सनं मोठा पराभव केला. या विजयानंतर दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावरून 6 व्या क्रमांकावर आली आहे. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. दिल्लीच्या विजयानंतर कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) डेव्हिड वॉर्नर आणि त्याचा सलामीचा जोडीदार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मॅचनंतर पंत म्हणाला की, 'मी त्या दोघांना पूर्ण स्वातंत्र्य देतो, कारण त्यांना त्यांचा रोल माहिती आहे.' पंजाब विरूद्धच्या मॅचमध्ये दोघांनीही दमदार कामगिरी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 6.3 ओव्हर्समध्ये 83 रन काढले. पृथ्वी 20 बॉलमध्ये 41 रन काढून आऊट झाला. त्याने 7 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर वॉर्नर 30 बॉलमध्ये नाबाद 60 रन केले 'पॉवर प्ले' मध्ये विक्रम दिल्ली कॅपिटल्सनं वॉर्नर आणि पृथ्वीच्या आक्रमक बॅटींगमुळे पॉवर प्लेमध्ये नवा रेकॉर्ड केला. त्यांनी पहिल्या 6 ओव्हर्समध्ये 81 रन काढले. आयपीएल इतिहासातील हा रेकॉर्ड आहे. यापूर्वी त्यांनी 2008 साली आरसीबी विरूद्ध 71 रन केले होते. वॉर्नर-शॉ जोडीनं चौथ्यांदा अर्धशतकी भागिदारी केली आहे. यापूर्वी त्यांनी लखनऊ विरूद्ध 7.3 ओव्हर्समध्ये 67, केकेआर विरूद्ध 8.4 ओव्हर्समध्ये 93, आरसीबी विरूद्ध 4.4 ओव्हर्समध्ये 50 रनची भागिदारी केली होती. पृथ्वी शॉने या सिझनमध्ये आत्तापर्यंत 2 अर्धशतकं झळकावली आहेत. IPL 2022 : कुलदीप यादवनं दाखवलं मोठं मन, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान! डेव्हिड वॉर्नरचा आयपीएल रेकॉर्ड हा जबरदस्त आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक रन करणारा विदेशी खेळाडू आहे. वॉर्नरनं टार्गेटचा पाठलाग करताना 29 अर्धशतक झळकावली आहेत. ही आयपीएलमधील कोणत्याही खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी आहे. शिखर धवननं हे 21 वेळा केले असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गौतम गंभीर, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी प्रत्येकी 20 वेळा ही कामगिरी केलीय. वॉर्नरनं यावेळी पंजाब किंग्ज विरूद्ध 1 हजार रन ही पूर्ण केले आहेत. एकाच टीमविरूद्ध हजार रन करणारा तो दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी रोहित शर्मानं केकेआर विरूद्ध हजार रनचा टप्पा पूर्ण केलाय.
First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Punjab kings

पुढील बातम्या