मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2023: बीसीसीआयनं IPL रजिस्ट्रेशनसाठी दिली डेडलाईन, हे दिग्गज खेळाडूही उतरणार लिलावात

IPL 2023: बीसीसीआयनं IPL रजिस्ट्रेशनसाठी दिली डेडलाईन, हे दिग्गज खेळाडूही उतरणार लिलावात

आयपीएल रजिस्ट्रेशनसाठी तारीख पक्की

आयपीएल रजिस्ट्रेशनसाठी तारीख पक्की

IPL 2023: इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रूटनंही लिलावासाठी स्वत:चं नाव रजिस्टर केलं आहे. यावेळी एखाद्या फ्रँचायझीकडून बोली लागण्याची अपेक्षा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 23 नोव्हेंबर: IPL 2023 चं मिनी ऑक्शन 23 डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयनंही खेळाडूंच्या रजिस्ट्रेशनसाठी शेवटचा दिवस निश्चित केला आहे. यानुसार लिलावात सहभागी होण्यासाठी खेळाडूंना 15 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. सॅम करन, बेन स्टोक्स आणि कॅमेरून ग्रीन हे या लिलावाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचं मानलं जात आहे. इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रूटनंही लिलावासाठी स्वत:चं नाव रजिस्टर केलं आहे. यावेळी एखाद्या फ्रँचायझीकडून बोली लागण्याची अपेक्षा आहे. रूटने 2018 च्या आयपीएलसाठीही नाव दिलं होतं. पण त्याच्यावर बोली लागली नाही.

ऑक्शनची तारीख बदलणार?

आयपीएलच्या मिनी ऑक्शनसाठी निश्चित केलेली तारीख कदाचित बदलली जाण्याची शक्यता आहे. खरं तर आयपीएल फ्रँचायझींनी बीसीसीआयकडे तारीख बदलण्याची मागणी केल्याची माहिती आहे. त्यावर बीसीसीआयकडून विचार सुरु आहे. 23 डिसेंबर हा ख्रिसमसच्या आसपासचा दिवस असल्यानं फ्रँचायझींना त्यांचे बरेच परदेशी कर्मचारी उपलब्ध होणार नाहीत. अनेक फ्रँचायझींकडे परदेशी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. आयपीएलच्या दहापैकी सात संघांचे मुख्य प्रशिक्षकही परदेशी आहेत. पुढील आठवड्यात या विषयावर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये दोन दिवस मेगा लिलाव झाला होता. मात्र मिनी लिलाव एक दिवसाचा असेल.

हेही वाचा - Mumbai Indians: मुंबई इंडियन्स 'पलटन'साठी गुड न्यूज! IPL च्या आधी 'तो' परत आलाय

कुणाकडे किती रक्कम?

163 खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझींनी कायम ठेवलं आहे तर 85 खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे. मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक रक्कम असेल. हैदराबादच्या पर्समध्ये 42.25 कोटी रुपये आहेत. तर पंजाब किंग्जकडे 32.20 कोटी रुपये, लखनऊ सुपरजायंट्सकडे 23.35 कोटी रुपये, मुंबई इंडियन्सकडे 20.55 कोटी रुपये आणि चेन्नई सुपर किंग्जकडे 20.45 कोटी रुपये शिल्लक आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Ipl, Sports