मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: महामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार? 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी

T20 World Cup: महामुकाबल्यात हा खेळाडू पुन्हा डोकेदुखी ठरणार? 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी

मोहम्मद रिझवान बाबर आझमसह

मोहम्मद रिझवान बाबर आझमसह

T20 World Cup: आगामी वर्ल्ड कपमध्ये रिझवान नावाच्या तोफेला रोखण्याची गरज आहे. गेल्या 12 सामन्यात रिझवाननं तब्बल 8 अर्धशतकं ठोकली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 7 ऑक्टोबर: भारत आणि पाकिस्तान संघात ऑक्टोबरच्या 23 तारखेला महामुकाबला रंगणार आहे. या महामुकाबल्यात टीम इंडिया गेल्या वर्षीच्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. पण त्यासाठी भारतीय संघाला पाकिस्तानच्या सध्या फॉर्मात असलेल्या एका महत्वाच्या शिलेदाराचा बंदोबस्त करावा लागेल. कारण तो मैदानात उतरताच पाकिस्तानचा स्कोअरबोर्ड वेगानं फिरतो. त्याला थांबवणं बॉलर्ससाठी आव्हान ठरतं. तो आहे पाकिस्तानचा विकेट किपर बॅट्समन मोहम्मद रिझवान. रिझवाननं यंदाच्या वर्षात धावांचा पाऊस पाडलाय. आणि सध्या तर तो तुफान फॉर्मात आहे.

12 सामने 8 अर्धशतकं

मोहम्मद रिझवाननं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये हे वर्ष गाजवलंय. आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात रिझवाननं मोठ्या खेळी केल्या होत्या. सुपर फोरमध्ये त्याच्याच खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं भारतावर विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी वर्ल्ड कपमध्ये रिझवान नावाच्या तोफेला रोखण्याची गरज आहे. गेल्या 12 सामन्यात रिझवाननं तब्बल 8 अर्धशतकं ठोकली आहेत.

हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात, BCCI ने शेअर केला हा खास फोटो

2022 मध्ये रिझवानची कामगिरी

सामने - 14

धावा - 698

अर्धशतकं - 8

सरासरी - 63.45

स्ट्राईक रेट - 130.22

हेही वाचा - FIFA WC 2022: करोडो फुटबॉल चाहते हळहळले... 'या' खेळाडूची मोठी घोषणा, खेळणार शेवटचा वर्ल्ड कप

वर्ल्ड कप सामना महत्वाचा-रिझवान

दरम्यान आज बांगलादेशविरुद्धच्या टी20 सामन्यात रिझवाननं दमदार फलंदाजी करताना 71 धावा फटकावल्या. तिरंगी मालिकेतील या पहिल्याच सामन्यात रिझवानच्या खेळीनं पाकिस्तानला विजय मिळवून दिला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रिझवानला भारत-पाकिस्तान सामन्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रिझवान म्हणाला... 'भारत आणि पाकिस्तान सामना हा नक्कीच हाय व्होल्टेज सामना असतो. पण आम्ही इतर सामन्यांसारखच वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो. गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान संघात इतके सामने झाले आहेत की आता तितकं काही वाटत नाही. पण हा वर्ल्ड कपचा सामना आहे त्यामुळे आमच्यासाठी तो जास्त महत्वाचा आहे.'

भारतासाठी मोठा अडसर

महामुकाबल्यात मोहम्मद रिझवानची विकेट भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण भारताविरुद्ध नेहमीच रिझवान आक्रमकपणे खेळताना दिसतो. गेल्या वर्षी वर्ल्ड कप सामन्यात रिझवाननं बाबर आझमच्या साथीन 152 धावांचा पाठलाग यशस्वीपणे केला होता. त्यानंतर गेल्या आशिया कपमध्येही दोन्ही डावात रिझवानच भारतासमोरचा महत्वाचा अडसर ठरला होता. त्यामुळे आगामी वर्ल्ड कपमध्येही रिझवानची विकेट हेच भारतासाठी महत्वाचं टार्गेट असणार आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, India vs Pakistan, T20 world cup 2022, Team india