मुंबई, 11 नोव्हेंबर: गुरुवारी अॅडलेडच्या मैदानात पार पडलेला भारत आणि इंग्लंड संघातला टी20 वर्ल्ड कपचा सामना भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं टर्निंग पॉईंट ठरणारा आहे. पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धा जिंकण्यात टीम इंडियाला अपयश आलं. त्यामुळे टीम इंडियामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि त्याची सुरुवातही झाली आहे. टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर अवघ्या काही तासात संघाच्या एका सदस्यचा करार संपुष्टात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही व्यक्ती 4 महिन्यांपूर्वीच टीम इंडियाशी जोडली गेली होती. पॅडी अप्टन यांचा करार संपुष्टात भारतीय संघातील ती व्यक्ती आहे सपोर्ट स्टाफ मेंबर पॅडी अप्टन. पॅडी अप्टन हे टीम इंडियाचे स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग कोच होते. आशिया कपआधी जुलै महिन्यात पॅडी अप्टन यांची बीसीसीआयनं नियुक्ती केली होती. पण अवघ्या चारच महिन्यात त्यांचा करार संपवला आहे.
विराटचे ‘ट्रबलशूटर’ पॅडी अप्टन टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला पुन्हा फॉर्ममध्ये आणण्याचं मोठं श्रेय पॅडी अप्टन यांना जातं. ते जुलै महिन्यात टीम इंडियामध्ये आले. त्यानंतर आशिया कपपासून विराट कोहलीचा फॉर्म परत आला. आशिया कपममध्ये विराटनं धावांचा आणि शतकांचा दुष्काळ तीन वर्षांनी संपवला. तर वर्ल्ड कपमध्येही त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. या सगळ्यामागे पॅडी अप्टन यांचा मोठा हातभार आहे. पण इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया वर्ल्ड कपच्या मैदानात हरली आणि त्यांचा करारही संपला. हेही वाचा - T20 World Cup: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल, रोहितनंतर ‘हा’ होणार टी20चा नवा कॅप्टन? पॅडी अप्टन यांची कारकीर्द दक्षिण आफ्रिकेचे पॅडी अप्टन हे 2008 साली पहिल्यांदा भारताचे स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग कोच बनले. त्यावेळी गॅरी कर्स्टन हे भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. या जोडीनं तीन वर्षात भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं. इतकच नव्हे तर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आणि धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकला होता.
त्यानंतर पॅडी अप्टन यांनी वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझीजसाठी कोच म्हणून काम पाहिलं. सध्या ते राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. पण त्याआधी त्यांनी पुणे वॉरियर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांचं प्रशिक्षकपदही सांभाळलं होतं.