जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: एअरपोर्टवर शार्दूल ठाकूरचा पारा चढला... हरभजनची मध्यस्थी पण नेमका काय घडला ड्रामा?

T20 World Cup: एअरपोर्टवर शार्दूल ठाकूरचा पारा चढला... हरभजनची मध्यस्थी पण नेमका काय घडला ड्रामा?

शार्दूल ठाकूर

शार्दूल ठाकूर

T20 World Cup: खरं तर सर्वसामन्यांना एअरपोर्टवर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पण आज टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरलाच याचा फटका बसला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापतींचं लागलेलं ग्रहण अद्यापही सुटलेलं नाही. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला जाणारा आणखी एक खेळाडू आज जायबंदी झाला त्यामुळे भारतीय संघात शार्दूल ठाकूरची स्टँड बाय खेळाडूंमध्ये वर्णी लागली. हाच शार्दूल ठाकूर आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर आज मुंबईत पोहोचला तेव्हा एअरपोर्टवर त्याला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. त्यानं त्यानंतर ट्विटही केलं. पण एअरपोर्टच्या ढिसाळ कारभारामुळे शार्दूलचा पारा चांगलाच चढला होता. यावेळी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजन सिंगनं शार्दूलच्या ट्विटरवर रिप्लाय केला आणि माफीही मागितली. शार्दूलचं ट्विट, भज्जीची माफी खरं तर सर्वसामन्यांना एअरपोर्टवर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पण आज टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरलाच याचा फटका बसला. शार्दूलची बॅग मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल -2 वरुन गायब झाली. त्यानंतर शार्दूलनं एक ट्विट केलं आणि मदत मागितली. ट्विटमध्ये त्यानं माहिती दिली की ‘माझी किटबॅग अजूनही मिळालेली नाही… लगेज बेल्टवर मी माझ्या सामानाची वाट बघतोय. इथे एअरलाईन्सचा कोणी माणूसही हजर नाही.’ शार्दूल ठाकूरच्या या ट्विटवर हरभजन सिंगनं रिप्लाय दिला. आणि माफी मागून लगेच मदतीची ग्वाही दिली. पण या सगळ्या प्रकारावर हरभजननं शार्दूलची माफी का मागितली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हरभजननं माफी का मागितली? शार्दूलनं एअर इंडियाला टॅग करुन त्या ट्विटमध्ये पुढे असं म्हटलं होतं की ‘लगेच बेल्टवर आपण माझ्यासाठी मदत पाठवू शकता का? हे माझ्यासोबत पहिल्यांदाच झालेलं नाही. माझं सामान वेळेवर मिळेल यासाठी कंपनीचा कोणताही कर्मचारी इथे हजर नाही.’ यावर आम आदमी पक्षाचा राज्यसभा खासदार आणि माजी क्रिकेटर हरभजननं रिप्लाय दिला… ‘काळजी करु नकोस, तुला तुझं सामान मिळेल. आमचे कर्मचारी तिथे पोहोचतील. गैरसोईबाबत आम्हाला खेद आहे. दरम्यान हरभजननं हे करण्याचं कारण म्हणजे भज्जी हा एअर इंडियाचा माजी कर्मचारी आहे. आणि तो एअर इंडियाकडून क्रिकेट खेळला आहे.

News18

News18

हेही वाचा -  Ind vs SA ODI: आधी साप आणि आता भर मैदानात घुसला कुत्रा… पाहा भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये कसा उडाला गोंधळ? Video शार्दूलला मिळाली मदत ट्विटनंतर शार्दूलला मदत मिळाली पण ती दुसऱ्या एअरलाईन्सकडून. त्यानंतर त्यानं ट्विट करत भज्जीचे आभारही मानले… ‘भज्जी पाजी धन्यवाद… मला दुसऱ्या एका एअरलाईन्सनं मदत केली.’

News18

चहर आऊट, शार्दूल इन दरम्यानं आज टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला तो म्हणजे दीपक चहरच्या रुपात. भारतीय संघात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत दीपक चहर जायबंदी झाला. आणि याच दुखापतीमुळे तो आता टी20 वर्ल्ड कपलाही मुकणार आहे. चहर हा वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघात स्टँड बाय खेळाडू होता. पण आता त्याच्या जागी शार्दूल ठाकूरचा स्टँड बाय प्लेयर म्हणून टी20 संघात संघात समावेश करण्यात आला आहे. शार्दूलनं नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी बजावली होती. शार्दूल, शमी आणि सिराज उद्या ऑस्ट्रेलियाला निघणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात