जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs SA ODI: आधी साप आणि आता भर मैदानात घुसला कुत्रा... पाहा भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये कसा उडाला गोंधळ? Video

Ind vs SA ODI: आधी साप आणि आता भर मैदानात घुसला कुत्रा... पाहा भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये कसा उडाला गोंधळ? Video

मैदानात श्वानाचं आगमन

मैदानात श्वानाचं आगमन

Ind vs SA ODI: दिल्लीतल्या या सामन्यादरम्यान असं काही तरी घडलं जे सहसा आंतरराष्ट्रीय सामन्यात घडण्याची अपेक्षा नसते. कडेकोट बंदोबस्त असताना मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान चक्क एक कुत्रा मैदानात घुसला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: टीम इंडियानं नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सनी हरवून मोठा पराक्रम गाजवला. धवनच्या भारतीय संघानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. भारताचा यंदाच्या वर्षातला हा सलग पाचवा वन डे मालिकाविजय ठरला. पण या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली. पण त्यामुळे काही काळ भर मैदानात गोंधळ उडाला होता. खरं तर अरुण जेटली स्टेडियमवरच्या या सामन्यात एक अनपेक्षित पाहुणा घुसला आणि त्यामुळेच हा सगळा गोंधळ उडाला होता. दिल्लीच्या मैदानात श्वानाचा गोंधळ दिल्लीतल्या या सामन्यादरम्यान असं काही तरी घडलं जे सहसा आंतरराष्ट्रीय सामन्यात घडण्याची अपेक्षा नसते. कडेकोट बंदोबस्त असताना मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान चक्क एक कुत्रा मैदानात घुसला. ग्राऊंड स्टाफनं त्याला मैदानाबाहेर काढलं पण दरम्यानच्या काळात त्यानं चांगलाच गोंधळ घातला.

News18

श्रेयस अय्यरनं कुत्र्याला पळवलं हा कुत्रा जेव्हा मैदानात शिरला तेव्हा श्रेयस अय्यर त्याला हाकलताना दिसला. सामन्यादरम्यान काढलेल्या एका फोटोमध्ये अय्यर कुत्र्याला बाहेर जाण्यासाठी इशारा करताना दिसत आहे. या श्वानमहाशयांनी केवळ खेळाडूंनाच नाही तर कॅमेरामनलाही कुत्र्याने त्रास दिला.

जाहिरात

News18

गुवाहाटीत झाली होती सापाची एन्ट्री याआधी गुवाहाटीच्या टी20 सामन्यात सापानं एन्ट्री मारली होती. त्यावेळीही सामना काही काळासाठी थांबवण्यात आला होता.

हेही वाचा -  Mushtaq Ali T20: सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरनं केला गोव्याकडून डेब्यू, पहिल्याच सामन्यात पाहा अर्जुनची कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा दरम्यान दिल्ली वन डेत टीम इंडियाच्या प्रभावी आक्रमणासमोर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली. मालिकाविजयाच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या दोन्ही संघांपैकी टीम इंडियाचं पारडं नवी दिल्लीत भारी ठरलं. धवननं टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा बॅटिंगचं आमंत्रण दिलं. टीम इंडियाच्या बॉलर्सनी ढगाळ वातावरण आणि ओलसर खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवताना आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. सुरुवातीला मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरनं दक्षिण आफ्रिकेची आघाडीची फळी माघारी धाडली. त्यानंतर कुलदीप यादव आणि शाहबाजच्या फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. दक्षिण आफ्रिकेनं अवघ्या 27.1 ओव्हर्स खेळून काढल्या आणि त्यांचा डाव 99 धावात आटोपला. त्यानंतर अवघं 100 धावांचं आव्हान टीम इंडियानं सहजपणे पार केलं. सलामीवीर शुभमन गिल (49) आणि फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरच्या (28) खेळीनं भारताला अवघ्या 19.1 ओव्हर्समध्ये विजय मिळवून दिला. पण कमी धावसंख्येच्या या सामन्यात कॅप्टन शिखर धवन (8) आणि ईशान किशन (10) हे मात्र अपयशी ठरले.

जाहिरात

कुलदीप यादवची जादू वॉशिग्टन सुंदर, सिराज आणि शाहबाजनं दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत धाडल्यानंतर कुलदीपनं तळाच्या फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर राहू दिलं नाही. त्यानं 4.1 ओव्हरमध्ये एक ओव्हर निर्धाव टाकताना 18 धावात 4 विकेट्स घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात