जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान

पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान

पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान

भारतीय क्रिकेट संघासमोर नव्या वर्षात खेळाडुंच्या दुखापतीचे आव्हान असणार आहे. भारताचे एक दोन नव्हे तर ८ खेळाडू सध्या दुखापतीने त्रस्त आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. अपघातानंतर तो दोन दिवस आयसीयूमध्ये होता. दरम्यान, संघ निवडीसाठी दुखापत झालेल्या खेळाडूंना पुन्हा संघात येण्याआधी DEXA टेस्ट द्यावी लागणार आहे. डेक्सा टेस्टद्वारे बोन डेन्सिटी तपासण्यात येते. त्याद्वारे खेळाडूंच्या संभाव्य दुखापतीची माहिती मिळण्यास मदत होईल. भारताचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडू सध्या दुखापतीने त्रस्त आहेत. या खेळाडूंसमोर आता संघात परतण्यासाठी DEXA चे आव्हान असणार आहे. रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर तो कसोटी मालिकेला मुकला होता. झेल घेताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली होती. बांगलादेश दौऱ्यात भारताचा वेगवान गोलंगाज दीपक चाहर यालाही दुखापतीचा सामना करावा लागला. हॅमस्ट्रिंगमुळे तो बांगलादेश दौऱ्यातून बाहेर झाला. आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो संघाचा भाग नसेल. हेही वाचा :  Rishabh Pant : पंतवरचं संकट टळलं; ICUमधून बाहेर, पण आता विश्रांती मिळेना जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला असला तरी अद्याप मैदानावर परतण्यासाठी त्याला वेळ लागू शकतो. बुमराहसोबत अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाही तंदुरुस्त झाला आहे. दोघांनाही फिटनेस टेस्ट देण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बंगळुरूमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र दोघांनाही फिटनेस टेस्ट पास करता न आल्यानं त्यांना श्रीलंकेविरुद्ध संधी दिली नसल्याचं म्हटलं जात आहे. तसंच बुमराह आणि जडेजा यांच्याबाबतीत निवड समितीने घाई न करण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्वाच्या असणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमुळे त्यांना विश्रांती दिली जात असल्याचे म्हटले जातेय. हेही वाचा :  यो-यो टेस्टनंतर आता खेळाडूंची निवड DEXAद्वारे, टीम इंडियाला कसा होणार फायदा? याशिवाय प्रसिद्ध कृष्णा पाठदुखीने त्रस्त आहे. तर नवदीप सैनी मांसपेशी दुखावल्याने बाहेर आहे. तर मोहम्मद शमीसुद्धा खांद्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. आठ जणांपैकी केवळ कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीचा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत समावेश आहे. श्रीलंकेविरुद्ध तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका मंगळवार 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात