जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / यो-यो टेस्टनंतर आता खेळाडूंची निवड DEXAद्वारे, टीम इंडियाला कसा होणार फायदा?

यो-यो टेस्टनंतर आता खेळाडूंची निवड DEXAद्वारे, टीम इंडियाला कसा होणार फायदा?

यो-यो टेस्टनंतर आता खेळाडूंची निवड DEXAद्वारे, टीम इंडियाला कसा होणार फायदा?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंच्या वाढत्या दुखापतींच्या समस्या पाहता समीक्षा बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 जानेवारी :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंच्या वाढत्या दुखापतींच्या समस्या पाहता समीक्षा बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. याआधी संघात निवड होण्याआधी खेळाडूंना योयो टेस्ट द्यावी लागत होती. पण आता बोर्डाने DEXAला निवड प्रक्रियेचा भाग बनवलं आहे. जर या स्कॅनमध्ये काही समस्या दिसली तर खेळाडूची संघात निवड होणार नाही. डेक्सा स्कॅनमध्ये एक्सरे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामधून हाडे किती मजबूत आहेत याची माहिती मिळते. तसंच टेस्ट हाडांमध्ये कोणत्या प्रकारच्या फ्रॅक्चरची शक्यता आहे का हेसुद्धा सांगते. हेही वाचा : T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा तो निर्णय चुकला; कार्तिकने दाखवलं रोहित अन् राहुल द्रविडकडे बोट डेक्सा टेस्टला बोन डेन्सिटी टेस्ट असंही म्हटलं जातं. हा एक विशेष प्रकारचा एक्सरे असतो. यात दोन प्रकारचे बीम तयार होतात ज्यात एक हाय एनर्जी आणि दुसरा लो एनर्जी बीम असतो. दोन्ही बीम हाडाचे एक्सरे काढतात. यात हाडाचा आकार किती आहे हेसुद्धा लक्षात घेतले जाते. दोन्ही बीमद्वारा काढलेल्या एक्सरेच्या आधारावर डॉक्टर बोन डेन्सिटी किती आहे ते मोजू शकतात. टी२० वर्ल्ड कप २०२२ च्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्याशिवाय सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, माजी निवड समिती प्रमुख चेतन शर्मा हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत खेळाडूंच्या निवडीच्या निकषाशिवाय इतरही काही निर्णय घेण्यात आले. हेही वाचा :  IPL, WTC आणि दोन वर्ल्ड कप; नव्या वर्षात टीम इंडियाचं कसं असेल शेड्युल? आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ च्या रोडमॅपसह खेळाडूंची उपलब्धता, वर्कलोड मॅनेजमेंट, फिटनेसचे निकष इत्यादी मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. त्यात डोमेस्टिक क्रिकेटच्या माध्यमातून निवड कशी होईल आणि फिटनेसबाबत निर्णय घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket , sports
  • First Published :
जाहिरात
जाहिरात