जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Rishabh Pant : पंतवरचं संकट टळलं; ICUमधून बाहेर, पण आता विश्रांती मिळेना

Rishabh Pant : पंतवरचं संकट टळलं; ICUमधून बाहेर, पण आता विश्रांती मिळेना

Rishabh Pant : पंतवरचं संकट टळलं; ICUमधून बाहेर, पण आता विश्रांती मिळेना

प्रकृतीत सुधारणा झाल्यानतंर ऋषभ पंतला आता खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. जवळपास 48 तास तो आयसीयूमध्ये होता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 02 जानेवारी : ऋषभ पंत च्या प्रकृतीत आता सुधारण होत आहे. शुक्रवारी 30 डिसेंबर रोजी त्याचा अपघात झाला होता. दिल्लीहून रुर्कीला घरी जात असताना त्याची गाडी महामार्गावर दुभाजकाला धडकली होती. अपघातानंतर जखमी अवस्थेत ऋषभ पंतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानतंर ऋषभ पंतला आता खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. जवळपास 48 तास तो आयसीयूमध्ये होता. बीसीसीआयसुद्धा त्याच्या प्रकृतीची माहिती घेत आहे. ऋषभ पंतवर पुढील उपचार मुंबई त केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऋषभ पंतला भेटण्यासाठी लोकांनी गर्दी केल्यामुळे त्याला पुरेशी विश्रांती घेता येत नसल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  यो-यो टेस्टनंतर आता खेळाडूंची निवड DEXAद्वारे, टीम इंडियाला कसा होणार फायदा? ऋषभ पंतची भेट घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रुग्णालयात येत आहेत. यामुळे तो विश्रांती घेऊ शकत नाहीय. पंतवर उपचार करणाऱ्या मेडिकल टीमच्या एका सदस्याने सांगितले की, क्रिकेटपटूला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. दुखापतीचा त्याला अजूनही त्रास होत आहे. भेटायला येणाऱ्या लोकांशी तो बोलत आहे. अशा परिस्थितीत त्याच्या रिकव्हरीला वेळ लागू शकतो. त्यामुळे लोकांनी त्याला जास्ती जास्त विश्रांती देण्यास सांगायला हवे. हेही वाचा : T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा तो निर्णय चुकला; कार्तिकने दाखवलं रोहित अन् राहुल द्रविडकडे बोट एका इतर मेडिकल स्टाफने सांगितलं की, पंतला भेटायला येणाऱ्यांसाठी काही वेळेची मर्यादा नाही. सर्वसामान्यपणे सकाळी 11 ते 1 आणि सायंकाळी 4 ते 5 या वेळेत रुग्णाला कोणीही भेटू शकतं. एका वेळी एकाच व्यक्तीला भेटण्याची परवानगी आहे. पण हे प्रकरण हाय प्रोफाइल आहे आणि सतत लोग येत आहेत. अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर हेसुद्धा पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात